महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी (Ladki Bahin Yojana) मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घातलेली E KYC ची अट स्थगित केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ताही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खरं तर इ केवायसी मुळे लाडक्या बहिणी टेन्शन मध्ये आल्या होत्या, मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
का घेतला निर्णय (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फायदा अनेक जण पात्र नसताना सुद्धा घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेसाठी ही केवायसी करण्याची अट घातली होती. मात्र, ई-केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या तर ई-केवायसी केल्यास अनेक महिलांची नावे यादीतून कट होण्याची शक्यता होती. त्यामुळेच महिला वर्गात मोठ्या भीतीचे वातावरण पसरले. सरकार जाणून-बुजून आम्हाला अपात्र करण्यासाठी ही केवायसी ची अट घालत आहे अशी भावना महिलांमध्ये सुरू झाली.

आगामी काळात निवडणुका
त्यातच आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अशावेळी जर महिला नाराज झाल्या तर त्यांच्या नाराजीचा फटका हा निवडणुकीत बसू शकतो. म्हणूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इ केवायसीची अट तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे असं बोललं जात आहे. मात्र सरकारकडून अद्याप यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
ऑक्टोंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात
दरम्यान, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाईल अशा चर्चा सुरू आहेत.











