मित्रांनो ट्रॅक्टर (Mini Tractor Subsidy) म्हणजे शेतकऱ्यांचा खरा मित्र ….शेतीच्या कामावेळी शेतकऱ्यांचा कामाचा भार हलका व्हावा यासाठी ट्रॅक्टर खूपच उपयोगी पडतो. ट्रॅक्टरच्या मदतीने शेतात नांगरणी, पेरणी, पाणी देणे आणि काढणीची कामे सोप्पी होतात. महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी ट्रॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अनेक बडे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी करत असतात. परंतु ट्रॅक्टरच्या किमती महाग असल्याने सर्वानाच तो खरेदी करणं शक्य नसते. अशावेळी शेतकऱ्यांना कमी पैशा ट्रॅक्टर खरेदी करता यावा यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे .या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर वर तब्बल 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही योजना नेमकी आहे काय?? यासाठी पात्रता कशी राहील?? आणि अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
काय आहे पात्रता ??
मित्रांनो मिनी ट्रॅक्टर बाबतची ही योजना (Mini Tractor Subsidy) फक्त अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. तसेच अर्जदाराकडे किमान 2 हेक्टर जमीन असावी…. शेतकरी वैयक्तिक स्वरूपात किंवा बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करू शकतो.

किती रुपयांचे अनुदान – Mini Tractor Subsidy
या योजनेच्या माध्यमातून सरकार ट्रॅक्टर खरेदीवर ३.१५ लाखांचे अनुदान (Tractor Subsidy) देत आहे. या योजनेअंतर्गत गटांना 9 ते 18 एचपी क्षमतेच्या मिनी ट्रॅक्टरसह कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, ट्रेलर इत्यादी आवश्यक शेती साधनांसाठी अनुदान मिळेल. अनुदानाची रक्कम DBT प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाते. नवीन मिनी ट्रॅक्टर ची किंमत साडेतीन लाख रुपये आहे, अशावेळी सरकारकडून 3 लाख 15 हजाराचे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना अवघ्या 35000 रुपयांत ट्रॅक्टर खरेदी करण्याची संधी आहे.
कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?
रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
7/12 आणि 8A उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
बचत गटाचे प्रमाणपत्र (अर्ज गटाच्या माध्यमातून करत असल्यास)
कुठे कराल अर्ज ?
ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान (Tractor Subsidy) मिळवण्यासाठी सदर शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल (MahaDBT) वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.यानंतर लॉगिन करून योजना निवडा.आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा.अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमचा बँक खात्यात जमा केली जाईल.