Mobile Phone : 2030 पर्यंत Mobile ची गरज संपणार; एकमेकांशी अशा प्रकारे संवाद साधता येणार

Asavari Khedekar Burumbadkar

मोबाईल (Mobile Phone) हा आजकाल सर्वाच्याच हातात बघायला मिळतो. अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे मोबाईल ही सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईल शिवाय कोणाचेच पान हलेना. परंतु मोबाईल ची हीच गरज 2030 नंतर राहणार नाही असा मोठा दावा जगातील श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी केला आहे. एलॉन मस्क यांच्या मते भविष्यात मोबाईल ची जागा एआय-आधारित उपकरणे घेतील. ज्यामुळे मोबाईलची गरज पूर्णपणे संपून जाईल.

काय म्हणाले एलोन मस्क

एलोन मस्क यांनी म्हटल की आपण सध्या वापरत असलेले स्मार्टफोन (Mobile Phone) हे खरे स्मार्ट डिव्हाइस नाहीत, तर एआय सिस्टमचा मर्यादित भाग आहेत. भविष्यात, मानव वापरत असलेले गॅझेट थेट सर्व्हरशी कनेक्ट होतील आणि मानवी विचारांना समजू शकतील. ते एका मुलाखतीत बोलत होते.

मस्क यांनी पुढे सांगितले की भविष्यातील एआय तंत्रज्ञान इतके प्रगत असेल की ते मानवी गरजा, भावना आणि अगदी माणसाचा मूड काय आहे हे सुद्धा समजू शकेल. याचा अर्थ असा की कोणतेही बटण दाबल्याशिवाय, डिव्हाइस आपोआप तुम्हाला काय हवे आहे हे समजेल.

मस्कचा दावा खरा ठरणार (Mobile Phone)

एलोन मस्कची ही भविष्यवाणी अशक्य वाटू शकते, परंतु त्यामागे ठोस संकेत आहेत. ओपनएआय सारख्या कंपन्या आधीच अशा गॅझेटवर काम करत आहेत जे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नाहीत. ओपनएआय एक ‘स्क्रीनलेस एआय डिव्हाइस’ तयार करत आहे जे डिस्प्लेशिवाय सर्व डिजिटल कामे करण्यास सक्षम असेल. या तंत्रज्ञानामुळे, स्मार्टफोनची गरज जवळजवळ नाहीशी होऊ शकते.

ताज्या बातम्या