राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी (Namo Shetkari Yojana) १९३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे लवकरच बळीराजाच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. खरंतर ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाल्यानंतर राज्य सरकारचे पैसे कधी मिळणार याकडे देशभरातील शेतकरी डोळे लावून बसला होता. नमो किसान महासन्मान योजना बंद पडणार ठीक आहे अशाही चर्चा सुरू होत्या मात्र आता महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 1932 कोटी रुपये मंजूर करत बळीराजाला दिलासा दिलेला आहे.
आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 6 हफ्ते मिळाले – Namo Shetkari Yojana
शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, शेती करत असताना त्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रमाणेही राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या स्वरूपात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेचे ६ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता ७ व्या हप्त्यासाठी सरकारने १९३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
96 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार–
सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे. या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे ९६ लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा १९३२ कोटी रुपयांचा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे
मागील महिन्यात २ ऑगस्टला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. साधारपणे, PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर ९ ते १० दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे (Namo Shetkari Yojana) पैसे जमा होत असतात. कारण ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे (Namo Shetkari Yojana) मिळतात. परंतु महिना उलटून सुद्धा नमो शेतकरी किसान सन्मान योजनेच्या हप्त्याबाबत काहीच अपडेट समोर येत नव्हते. त्यामुळे हे पैसे मिळणार का तरी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला होता मात्र आता सरकारने नमो किसान सन्मान शेतकरी योजनेसाठी आर्थिक तरतूद केल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.





