७ डिसेंबरला मुंबईत लोकलचा मेगाब्लॉक नाही; प्रवाशांना दिलासा, मेगाब्लॉक न घेण्याचे कारण काय?

Rohit Shinde

राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवार, ७ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. यामुळे प्रवाशांसह चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वे मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर दर आठवड्याच्या रविवारी ब्लॉक घेण्यात येतो.

मात्र शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून या दिवशी लाखोंच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अनुयायी सुमारे चार ते पाच दिवस शिवाजी पार्क परिसरात असतात. त्यामुळे उपनगरीय लोकलला मोठी गर्दी असते. त्यामुळे अनुयायांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.

रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक रद्द

मुंबईत रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक चालवला जातो. या दिवसांमध्ये रेल्वेच्या आणि रुळांच्या डागडुजीचे काम केले आहेत. 6 डिसेंबर रोजी शनिवारी महापरिनिर्वाण दिन आहे आणि 7 डिसेंबर रोजी रविवारी. यामुळे रविवारी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  महापरिनिर्वाण दिन 2025 निमित्त, रविवार, 7 डिसेंबर रोजी सीएसएमटी-कल्याण मेन लाईन आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर लाईनवर, ट्रान्स-हार्बर लाईन आणि पोर्ट लाईनसह, साप्ताहिक मेगा ब्लॉक चालवला जाणार नाही, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. मध्य रेल्वेने म्हटले आहे की, महापरिनिर्वाण दिवस २०२५ निमित्त रविवार, ७ डिसेंबर रोजी सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि पोर्ट मार्गासह, मुंबई उपनगरीय नेटवर्कवर साप्ताहिक मेगा ब्लॉक चालवला जाणार नाही.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय

मध्य रेल्वेने शुक्रवारी मुंबई लोकल ट्रेनच्या अपडेट्स शेअर करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिवस 2025 निमित्त मुंबईत साप्ताहिक मेगा ब्लॉक चालवला जाणार नाही. मध्य रेल्वेने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “महापरिनिर्वाण दिवस 2025″ निमित्त रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि पोर्ट मार्गासह, मुंबई उपनगरीय नेटवर्कवर साप्ताहिक मेगा ब्लॉक चालवला जाणार नाही.

सर्व विभागांवरील नियमित उपनगरीय सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील, असे त्यात म्हटले आहे.”प्रवाशांनी कृपया लक्षात ठेवावे आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे,” असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या एका निवेदनात, मध्य रेल्वेने गुरुवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या अपेक्षेनुसार, 5ते 7 डिसेंबर 2025 पर्यंत 13 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी जाहीर केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.

ताज्या बातम्या