Vande Bharat Express – रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवाशांसाचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. पंतप्रधानांनी रविवारी अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, बेंगळुरू–बेळगावी वंदे भारत आणि कटडा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या ३ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.
महाराष्ट्राला १२वी वंदे भारत एक्सप्रेस…
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात एकूण यापूर्वी ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र आता १२ वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारतमुळं वर्धा-मनमाडदरम्यान आतापर्यंत न पोहोचलेल्या भागाला सेवा देणारी ही पहिली वंदे भारत ठरणार आहे. नागपूर-पुणे दरम्यानची ही सर्वात वेगवान गाडी असून, सरासरी वेग ७३ किमी/तास आहे आणि प्रवासात १० थांबे आहेत. नागपूर आणि पुणे ही दोन्ही वेगाने विकसित होत असलेली महानगरे असून येथे असंख्य लघु व मध्यम उद्योग, नामांकित शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था तसेच ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे आहेत.
प्रवाशांना मोठा फायदा होणार…
रविवारी मोदींनी केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानक येथून अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, केएसआर बेंगळुरू–बेळगावि वंदे भारत आणि श्री माता वैष्णो देवी कटडा–अमृतसर वंदे भारत या ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर महाराष्ट्रात अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे या दोन शहरांदरम्यान आणि मार्गावरील इतर शहरांदरम्यान काम, व्यवसाय, शिक्षण व पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या मोठ्या संख्येतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी यांना नियमित प्रवास व विशेष सहलींसाठी याचा लाभ होणार असून, व्यापार आणि वाणिज्य वाढीसोबतच पर्यटनालाही चालना मिळणार आहे.





