MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

ST Bus Discount For Womens : ST ने हाफ तिकीट प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का; आता हे ओळखपत्र अनिवार्य

जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही.
ST Bus Discount For Womens : ST ने हाफ तिकीट प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का; आता हे ओळखपत्र अनिवार्य

राज्यातील महिलाना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा (ST Bus Discount For Womens) केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांचा प्रवास निम्म्या तिकिटावर होत आहे…. एसटीचे तिकीट निम्म्या पैशात मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर येत आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार येत्या काही काळात महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून प्रवास करण्यासाठी एक नवीन ओळखपत्र दाखवणे अनिवार्य राहणार आहे. ही ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिटात सवलत मिळणार आहे.

कोणते ओळखपत्र गरजेच? ST Bus Discount For Womens

मार्च 2023 पासून महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेवर साधी, मिनी, निमआराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जात आहे. आजही महाराष्ट्रातील करोडो महिला या सवलतीचा लाभ घेताना दिसतात. अजूनही सरकारची ही योजना महिलांसाठी मोठं वरदान ठरत आहे. यापूर्वी एसटी प्रवासादरम्यान 50% सवलत मिळवण्यासाठी महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखवणे गरजेचं होते. आधारकार्ड नसेल तर ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता.. आता मात्र एसटी महामंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केलं आहे. एसटी महामंडळाकडून हे ओळखपत्र दिले जाणार असून  महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर हे ओळखपत्र बनवावे लागणार आहेत.

या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जर तुमच्याकडे हे विशेष ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. अशावेळी तुम्हाला प्रवासाचे संपूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागतील. ST Bus Discount For Womens

का घेतला हा निर्णय?

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाकडून अधिकृत ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सवलतीचा प्रवास योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे तसेच यामुळे योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि व्यवस्थीत राबवता येणार आहे असा विश्वास एसटी महामंडळाला वाटत आहे.