अखेर ठाणेकरांचं स्वप्न साकार, नव्या मेट्रोची खासियत काय आहे? कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या A टू Z माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

Thane Metro Route – ठाणेकरांचं अनेक वर्षांचं मेट्रोतून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ठाण्यात बहुप्रतिक्षित अशा मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने मोठं पाऊल पुढं टाकण्यात आलं आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो 4 ए मार्गिकेवर घटस्थापनेच्या दिवशी पहिली चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

वडाळा-घाटकोपर- कासारवडवली हा मेट्रो मार्ग मेट्रो 4 या नावानं ओळखला जातो. तर गायमुख ते कासारवडवली हा मार्ग मेट्रो 4 ए नावानं ओळखला जातो. सोमवारी झालेली चाचणी मेट्रो 4 एची असली तरी लवकरच येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो 4 आणि मेट्रो 4 एवरील 10 स्टेशनांवर वाहतूक सुरू होणार आहे.

मेट्रोच्या कोणत्या 10 स्थानकांवर मेट्रो धावणार ?

कॅडबरी जंक्शन
माजिवडा
कापूरबावडी
मानपाडा
टिकुजीनी वाडी
डोंगरी पाडा
विजय गार्डन
कासारवडवली
गोवानिवाडा
गायमुख

या 10 स्टेशन्सचा मार्गावर 8 डब्यांची मेट्रो धावणार आहे. मेट्रो 4 आणि 4 ए मार्गावर एकून 32 मेट्रो स्थानकं आहेत. 2029 पर्यंत या मार्गावर पूर्ण वाहतूक सुरु होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.

कशी आहे मेट्रो 4?

मेट्रो मार्ग 4 आणि 4 ए एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून, यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत..पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच मुंबई ते ठाणे या दोन शहरांना जोडणारी 58 किमी लांबीची मेट्रो यानिमित्तानं सुरु होईल, असंही फडणवीस म्हणालेत.

तीन प्रमुख टप्प्यांमध्ये प्रकल्प साकारणार

ठाणे मेट्रो टप्पा – 1

गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंतची 10.5 किमीची मार्गिका सुरू होईल. यामध्ये एकूण 10 स्थानके असतील. यापैकी 4 स्थानके डिसेंबर 2025 पर्यंत तर उर्वरित 6 स्थानके एप्रिल 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे

ठाणे मेट्रो टप्पा – 2

कॅडबरी जंक्शन ते गांधी नगरपर्यंतचा 11 किमीचा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात 11 स्थानके असतील

ठाणे मेट्रो टप्पा – 3

गांधी नगर ते वडाळा 12 किमीचा अंतिम टप्पा आहे. ऑक्टोबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित 11 मेट्रो स्टेशन्सही यावेळी सुरु होतील. या चारही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यावर सुमारे 58 किमीचा भारतातील सर्वात मोठा उन्नत मार्ग उपलब्ध होईल. ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणाऱ्या या मेट्रोमुळे प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News