कॉर्पोरेटमधील ताण, तणाव आणि टॉक्सिक वर्क कल्चर हा आजकाल अनेक कर्मचाऱ्यांसाठी मोठा आव्हान बनला आहे. जास्त कामाचे दडपण, वेळेच्या मर्यादा, अधिकारी किंवा सहकाऱ्यांकडून होणारा दबाव यामुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. विषारी कार्यसंस्कृतीत, सहकारी किंवा मॅनेजमेंटकडून सतत नकारात्मक प्रतिक्रिया, टीका, तसेच असमान वागणूक दिसून येते. यामुळे मनोबल कमी होते आणि कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. अशा परिस्थिती तुम्हाला खाली नमूद केलेले काही उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
कॉर्पोरेटमध्ये काम करताना…
ऑफिसमधील प्रत्येकाला खुश करण्याची किंवा प्रत्येक गप्पा गोष्टींत सहभागी होण्याची गरज नाही. तुमच्या मर्यादा ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. नकारात्मक वातावरणात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्या संभाषणात सहभागी व्हायचे आणि कशात नाही हे स्पष्टपणे ठरवा.

विश्वासू मित्र किंवा सहकाऱ्यांची एक आधार प्रणाली तयार करा. त्यांच्यासोबत तुमच्या भावना शेअर करा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यामुळे तुम्हाला एकटे वाटणार नाही आणि तुम्ही अधिक मजबूत राहाल.
विषारी वातावरणामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. त्यामुळे, स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. ध्यान डायरी लिहिणे किंवा तुमचा आवडता छंद रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करा. यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तणावाचा सामना करणे सोपे होईल.
ऑफिसमधील प्रत्येक वादविवाद किंवा गॉसिपचा भाग होण्याची गरज नाही. नकारात्मक संभाषणांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची ऊर्जा अशा कामांवर केंद्रित करा, जी उत्पादक आणि तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत.











