उच्च रक्तदाब ही लाइफस्टाइलमुळे उद्भवणारी समस्या आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननुसार, प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अनेकदा लोकांना याबाबत माहितीही नसते. यामुळे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटलं जातं. यात एक चांगली बाब म्हणजे, काही सोप्या गोष्टी फॉलो केल्या तर बीपी नैसर्गिकपणे नियंत्रित करता येऊ शकतो. प्रसिद्ध योग गुरू हंसा योगेंद्र यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी बीपी कंट्रोल करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.
व्हिडिओमध्ये योग गुरू सांगतात, औषधांशिवाय तुम्ही बीपी केवळ एका मिनिटात कंट्रोलमध्ये आणू शकता. यासाठी त्यांनी तीन सोप्या आणि प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत.
रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी करा ही 3 कामं…
योगेंद्र प्राणायाम…
ही एक अतिशय सोपी श्वास घेण्याची पद्धत आहे. यासाठी तुम्हाला केवळ चारपर्यंत आकडे मोजावे लागतील आणि हळूहळू श्वास आत घ्यावा लागेल. थोडा वेळ श्वास रोखा, यानंतर चारपर्यतचे आकडे मोजेपर्यंत हळूहळू श्वास सोडा. श्वास घ्या आणि सोडण्याची वेळ योग्य ठेवा. ही पद्धत मज्जासंस्थेचे संतुलन राखते, ताण कमी करते आणि हृदयाचे ठोके सामान्य करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.
थंड पाण्याने चेहरा धुवा…
तुमच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवा. हंसाजींच्या मते, असे केल्याने मॅमेलियन डाइ्व्ह रिफ्लेक्स अॅक्टिव्हेट होतात, ज्यामुळे हृदय गती कमी होते आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. परिणामी रक्तदाब कमी होतो.
प्रोगेसिव्ह मसल रिजॅक्सेशन.. (PMR)
रक्तदाब वाढल्यानंतर आपल्या शरीरातील वेगवेगळे भाग आधी घट्ट आवळा, यानंतर मोकळं सोडा. उदा. डोळे जोरात बंद करा आणि सोडा. तुमचा जबडा घट्ट करा आणि सोडा. खांदे कानापर्यंत घेऊन जा आणि सोडा. मुठी घट्ट आवळा आणि सोडा. या प्रक्रियेमुळे तुमच्या शरीरातील ताण कमी होतो आणि तुम्हाला लगेच आराम वाटतो.
रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी काय कराल?
- मीठाचं सेवन कमी करा, जंक फूड आणि पॅकेट स्नॅक्स खाणं टाळा
- रोज कमीत कमी ३० मिनिटं चाला किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी करा.
- दररोज मेडिटेशन किंवा मोठा श्वास घ्या, ज्यामुळे ताण कमी होईल.
- गाढ आणि पुरेशी झोप घ्या.
- घरात असताना बीपी मॉनिटरने वेळो-वेळी रक्तदाब चेक करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





