आपल्या आजी-पणजीच्या काळात मातीच्या किंवा लोखंडी भांड्यामध्ये स्वयंपाक केला जात होता. लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्ये स्वयंपाक करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं असं सांगितलं जातं. सध्या आपण हिच लोखंडी भांडी गच्चीवर टाकून देत नॉन स्टिक, स्टिलची भांडी वापरत आहोत. मात्र जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत.
लोहाची कमतरता दूर होते..
सध्या अनेकांच्या रक्त तपासणीत लोह कमी असल्याचं सांगितलं जातं. मात्र केवळ लोखंडी भांड्यामध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या शरीरातील लोहाची आवश्यकता भरून निघू शकते. याशिवाय अनेक आजारांपासून तुमची सुटकाही होईल.
जर तुम्ही लोखंडी भांडी वापरत असाल तर यावर पोळी, भाज्या इतर पदार्थ मंद आचेवर शिजवणे योग्य मानले जाते. यासोबतच टोमॅटो आणि चिंच यांसारखे आंबट पदार्थ त्यात शिजवणे टाळावे. या भांड्यांचे तापमान ३५०°C पर्यंत ठेऊन स्वयंपाक करावा.
लोखंडी भांडी स्वयंपाकासाठी चांगली असू शकतात, परंतु काही पदार्थांसाठी ती योग्य नसतात. काही पदार्थ लोखंडी भांड्यात शिजवल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही या गोष्टी लोखंडी भांड्यात शिजवल्या तर ते अन्नाची चवच खराब करू शकत नाही. तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यापासून कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया..
आंबट गोष्टी अन् दुग्धजन्य पदार्थ…
टोमॅटो, चिंच, लिंबू, दही आणि इतर आंबट पदार्थांमध्ये आम्ल जास्त प्रमाणात असते. हे पदार्थ घालून बनवलेला कोणताही पदार्थ लोखंडी कढईत शिजवू नये. लिंबाचा रस आम्लयुक्त असतो, जो लोहावर प्रक्रिया करतो आणि पोटात गेल्यावर पोटाशी संबंधित आरोग्य समस्या निर्माण करतो. याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थ लोखंडी भांड्यात करू नये.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





