MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Beetroot Juice Benefits : सलग १५ दिवस बिटाचा रस प्यायल्याने काय होईल?

Written by:Smita Gangurde
Published:
बीट हे लोहाचा चांगला स्रोत मानले जाते. ज्यांना अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी त्याचे सेवन खूप चांगले मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया बीट खाण्याचे फायदे.
Beetroot Juice Benefits : सलग १५ दिवस बिटाचा रस प्यायल्याने काय होईल?

Beetroot Juice Benefits : बिटाचा रस आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्याला माहीत आहे. मात्र सलग १५ दिवस बिटाचा रस प्यायल्याने काय होतं? बिटाचा रस सलग १५ दिवस प्यायल्याने अनेक आजारांपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. आहारात बिटाचा समावेश अनेक प्रकारे करता येऊ शकतो. यामध्ये मँगेनीज, पोटॅशियम, आर्यन, फोलेट, विटॅमिन बी ६ आणि विटॅमिन सीसह अनेक तत्वांचा समावेश आहे. हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बीट हे लोहाचा चांगला स्रोत मानले जाते. ज्यांना अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी त्याचे सेवन खूप चांगले मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया बीट खाण्याचे फायदे.

बिटाचा रस पिण्याचे फायदे (bitacha ras pinyache fayde)

जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन कमी करू इच्छित असाल तर बिटाचा रस घेऊ शकता. यामध्ये अत्यंत कमी कॅलरी असते. आणि फॅट्सही नाही. याच्या रसाच्या सेवनाने वजन कमी व्हायला मदत होते.

त्वचा –

बिटामध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि विटॅमिन सी असतं. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो मिळायला मदत होते. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते…

बिटाचं नियमित सेवन केल्यानं इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

यकृताचे आरोग्य…

बिटाचा रस यकृताचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करतो, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहतं..

बिटामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. जे भूक नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीट सॅलडचा समावेश करू शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)