Benefits of cloves at night: लवंग हा पदार्थ सर्वसाधारणपणे सर्वच घराच्या स्वयंपाकघरात आढळतो. अन्नाची चव वाढविण्यासाठी लवंग आवर्जुन वापरली जाते. मात्र चव वाढविण्याबरोबरच आरोग्यासाठी लवंग फायदेशीर आहे. रात्री झोपताना लवंग खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी रात्री लवंग खाण्याचे काही फायदे सांगितले आहेत.
डॉक्टर काय सांगतात?
ही लहानशी लवंग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषत: रात्री लवंग खाणे किंवा त्याचं पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

पचनक्रिया सुधारते
झोपण्यापूर्वी लवंगांचं पाणी प्यायल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.
गाढ झोप
लवंगांमध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात ज्यामुळे तणाव कमी होऊन डोकं शांत राहतं. ज्यामुळे झोप चांगली येते.
लिव्हर डिटॉक्स होतो
लवंग शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करते. विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंगा चावून खाल्ल्याने किंवा लवंगाचं पाणी प्यायल्याने लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होते.
सर्दी-खोकल्यातून आराम
डॉक्टर बर्ग यांनी सांगितलं की, लवंग गरम असल्याने आणि यात अँटीबॅक्टेरियल गूण असल्याने घशातील खवखव, खोकला आणि कफात आराम मिळतो.
दात आणि हिरड्यांसाठीही फायदेशीर
रात्री लवंग चावून झोपल्यास सकाळी तोंडातून दुर्गंधी येत नाही. सोबतच तुमची ओरल हेल्थ चांगली राहते. विशेषत: दातांच्या वेदनेतून आराम मिळतो.
हृदय आणि रक्तप्रवाहात फायदेशीर
लवंगाच्या पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचं पाणी प्यायल्याने यातील अँटीमायक्रोबियल गुण शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता मजबूत करतात.
लवंगाचं पाणी कसं तयार कराल?
– 4-5 लवंगा एक कप पाण्यात टाकून उकळवा.
– उकळी आल्यानंतर पाच मिनिटांपर्यंत मंद गॅसवर झाकून ठेवा.
– यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्या.
– हे पाणी साधारण एका तासानंतर प्या.
– झोपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी हे पाणी प्या. यातून तुमच्या शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)