MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

दूध आणि दुग्धजन्य पदार्थच वाढवत नाहीत कॅल्शिअम, ‘हे’ पदार्थसुद्धा आहेत उत्तम स्रोत

Published:
जे लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाहीत त्यांना कॅल्शिअम वाढवण्यासाठी काही इतर पदार्थ खाता येतात.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थच वाढवत नाहीत कॅल्शिअम, ‘हे’ पदार्थसुद्धा आहेत उत्तम स्रोत

Foods that increase calcium:   बऱ्याच लोकांना हाडे कमकुवत झाल्याची समस्या उद्भवते. कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जेव्हा कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाण्याचा विचार येतो तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येतात. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना दूध पिणे आवडत नाही, किंवा दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

अशा परिस्थितीत, ते लोक गोंधळून जातात की कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांनी काय खावे? पोषणतज्ञ सांगतात की हाडे मजबूत करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ हा एकमेव मार्ग नाही. जर तुम्हाला लॅकटोजची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ आवडत नसतील, तर असे अनेक पदार्थ आहेत जे कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकतात आणि तुमची हाडे मजबूत करू शकतात.

 

कच्च्या डाळी-

शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण डाळींचा समावेश करू शकता. राजमा, हरभरा, काळी मसूर, कुळीथ यासारख्या बहुतेक डाळी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. प्रत्येक १०० ग्रॅम कच्च्या डाळीमध्ये सुमारे २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. जे तुम्ही सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता.

पांढरे किंवा काळे तीळ-
पांढरे आणि काळे तीळ हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. सुमारे १० ग्रॅम तिळांमध्ये १४० मिलीग्राम कॅल्शियम असते. म्हणून, कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी, तुम्ही दररोज सुमारे २ ते ३ चमचे पांढरे किंवा काळे तीळ खाऊ शकता. तुम्ही काळे तीळ अन्नात, रस, पेये किंवा पाण्यामध्ये मिसळून खाऊ शकता.

 

कॅल्शियमयुक्त भाज्या-

हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. तुमच्या आहारात टोफू, सोयाबीन, ब्रोकोली आणि भेंडी यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता.

गाजर आणि पालकचा रस-
पालक आणि गाजर हे देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. दररोज एक ग्लास गाजर आणि पालकाचा रस प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होऊ शकते. म्हणून ते तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करा. एक ग्लास गाईच्या दुधात म्हणजेच २०० मिली दुधात २४० मिलीग्राम कॅल्शियम असते, तर एक ग्लास पालक आणि गाजराच्या रसात सुमारे ३०० मिलीग्राम कॅल्शियम असते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)