दात किडण्याची समस्या वाढलीय? मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Home remedies for tooth Cavity:  दात किडणे ही एक सामान्य समस्या आहे. जी बहुतेकदा चॉकलेट, बिस्किटे, केक, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स यांसारख्या साखरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन आणि पांढऱ्या साखरेचे जास्त सेवन यामुळे होते. दात किडणे सामान्यतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येते, परंतु प्रौढांमध्ये देखील हे होऊ शकते.

तज्ञांचे म्हणणे आहे की हे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांच्या जास्त सेवनामुळे होते.जे दातांना चिकटतात आणि तेथे बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया प्लेक तयार करतात. प्लेकमधील आम्ल इनॅमलवर परिणाम करते, ज्यामुळे किडतात. जर दात किडत असतील, तर डॉक्टर कीडलेले दात काढून टाकतात, परंतु जर समस्या नुकतीच सुरू झाली असेल तर ती काही उपायांनी टाळता येऊ शकते….

 

मीठ पाणी-

दात किडण्यावर उपचार करण्यासाठी, एका ग्लास पाण्यात मीठ मिसळा आणि त्यासोबत गुळण्या करा. आयुर्वेदात दात किडण्यावर उपचार करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे खूप प्रभावी मानले जाते. विशेषतः झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने दात किडणे कमी होऊ शकते.

 

लवंग-

लवंग प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. अँटीसेप्टिक, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध, लवंग दातदुखी, दात किडणे किंवा दोन्हीसाठी फायदेशीर आहे. दातांना लवंग तेल लावल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते.

कडुलिंब-
प्राचीन काळी, दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काड्यांचा वापर केला जात असे. कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. तसेच फायबर असते, जे दातांवर प्लेक जमा होण्यापासून रोखते. दात किडणे आणि वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरू शकता.

अधिक कॅल्शियम घ्या-
कॅल्शिअम हा तुमच्या हाडांचा आणि दातांचा हा मुख्य घटक आहे. दात ठेवण्यासाठी दररोज दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, क्रीम आणि चीज) खा.

फ्लॉसिंगची सवय लावा-
अनेकांना फ्लॉस करायला आवडत नाही. परंतु, नियमित फ्लॉसिंग केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्न निघून जाते आणि पोकळी निर्माण होण्याचा धोका कमी होतो. ब्रश केल्याने दात पूर्णपणे साफ होत नाहीत आणि येथेच जंतू राहण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, तुम्ही निश्चितच फ्लॉसिंग करावे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News