MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Chakli Recipe: घरात बनवा बाजारसारखी खुसखुशीत खमंग चकली, इथे पाहा रेसिपी

Published:
How to make Chakli: चहासोबत खा खुसखुशीत खमंग चकली, इथे पाहा रेसिपी
Chakli Recipe:   घरात बनवा बाजारसारखी खुसखुशीत खमंग चकली, इथे पाहा रेसिपी

Chakli recipe Marathi:  दिवाळीनिमित्त बहुतेक महिलांना बाजारातून मिठाई आणि नमकीन खरेदी करायला आवडते. परंतु काही महिला अशा आहेत ज्यांना कोणतेही कारण आणि सण नसतानादेखील घरी नमकीन बनवायला आवडतात. अशा महिलांसाठी, आज आम्ही  खास चकलीची रेसिपी घेऊन आलो आहोत. जर तुम्हालाही यावेळी घरी काहीतरी ट्राय करायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

 

साहित्य-

१ कप तांदळाचे पीठ
१/२ कप बेसन
१/२ टीस्पून हळद पावडर
१/४ टीस्पून काळी मिरी पावडर
१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून ओवा
१ टेबलस्पून तीळ
१ चिमूटभर हिंग
गरजेनुसार तेल
चवीनुसार मीठ

रेसिपी-

स्टेप १-
चकली बनवण्यासाठी, सर्वप्रथम हळद, काळी मिरी, बेसन, जिरे, ओवा, हिंग, २ चमचे तेल, मीठ आणि पांढरे तीळ असे सर्व मसाले पिठात घाला आणि पीठ हलक्या हाताने मळून घ्या.

स्टेप २-
आता चकली मशीनमध्ये थोडे मळलेले पीठ घाला आणि गोलाकार चकली बनवा.

स्टेप ३-
आता एका कढईमध्ये तेल गरम करा आणि चकली हलक्या तपकिरी रंगाची होईपर्यंत तळा आणि बाहेर काढा.

स्टेप ४-
अशाप्रकारे तुमची खुसखुशीत खमंग चकली खाण्यासाठी तयार आहे