मुंबई- उन्हाळ्याचे दिवस असो की हिवाळ्याचे दिवस, भारतीयांच्या थाळीत दही आणि ताकाचा समावेश नेहमीच पाहाययला मिळतो. दोघांचीही चव आणि स्वाद वेगवेगळा असला तरी आपल्या थाळीत दोन्हींचं महत्त्व आहे.
दही आणि ताक हे दोन्हीही आपल्या शरीरासाठी पोषण देणारेचे घटक आहेत. अनेकांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की दही किंवा ताक यातील कोणता पर्याय प्रकृतीसाठी अधिक फायदेशीर आहे.

दह्याचे काय आहेत फायदे?
दही किंवा ताक हे दोन्ही पदार्अथ दुधापासूनच तयार केले जातात. त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया मात्र भिन्न आहेय. यातील दह्याच्या महत्त्वावर एक नजर टाकूयात.
1. दुधापासून तयार करण्यात येणारं दही हे शरीराच्या पोषणासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यात कॅल्अशियम, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी दही चांगलं असतं.
2. दही हाडांसाठी आणि दातांसाठी चांगलं असतं.
3. दह्याच्या सेवनामुळे पोटात चांगले बॅक्टेरिया निर्माण होतात, यामुळे पचनक्रिया चांगली होते.
4. दररोद दही खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.
5. जर वजन वाढवायचं असेल तर दही फायदेशीर असतं, कारम त्यात न्यूट्रियन डेन्सिटी मोठ्या प्रमाणात असते.
ताकाचे काय आहेत फायदे?
दह्यासोबतच ताकाचं आहारातील प्रमाण वाढताना दिसतंय. ताकाचे फायदे काय आहेत हेही जाणून घेऊयात.
. दह्यात पाणी घालून आणि विसळून ताक तयार करण्यात येतं. ताकं हलकं आणि पचनासाठी चांगलं असतं.
3. उन्हाळ्याच्या काळात उष्माघाताचा त्रास कमी करण्यासाठी ताक फायदेशीर मानण्यात येतं.
4. ताकात असलेलं लेक्टिक अॅसिडमुळे पचनास मदत होते, यामुळे एसिडीटीचा त्रास कमी होतो.
5. ताकामुळे शरीरात थंडावा राहतो आणि यामुळे हायड्रेशन होतं.
6. वजन कमी करण्यासाठी ताक फायदेशीर मानण्यात येतं. यात कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
7. ताकात जीरे पावडर आणमि काळं मीठ घातल्यानंतर त्याच्या चवीत फरक पडतो आणि प्रकृतीसाठीही हे उत्तम मानण्यात येतं.
दही आणि ताक यात काय उत्तम?
दही आणि ताक अशी तुलना होऊ शकत नाही. हाडांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी दही उपयोगी आहे. तर उन्हाळ्यात डी हायड्रेशन रोखण्यासाठी आणि शरीरात थंडपणा टिकवण्यासाठी ताक उपयोगी ठरते. वजन वाढवायचे असेल तर दही खायला हवं, तर वजन कमी करायचं असेल तर ताकाचं सेवन वाढवण्याचं सांगण्यात येतं. दही आणि ताकाचे वेगवेगळे उपयोग असल्यानं ऋतु आणि डाएट पाहून यातील कशाचाही स्वीकार केला तरी तो शरीरासाठी फायदेशीरच असेल.











