Symptoms of diabetes: मधुमेह ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. बऱ्याचदा, सकाळी उठल्यावर शरीरात काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात, जी रक्तातील उच्च साखरेच्या पातळीकडे इशारा करतात.
जर ही लक्षणे ओळखली गेली आणि त्वरित उपचार करून गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. डायबिटीसकडे इशारा करणारी सकाळी उठल्यावर दिसून येणारी काही लक्षणे जाणून घेऊया….

तोंड कोरडे पडणे आणि तहान लागणे-
जर तुम्हाला सकाळी उठल्यावर तोंड कोरडे आणि सतत तहान जाणवत असेल, तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते. जेव्हा साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा मूत्रपिंड मूत्रमार्गे जास्त ग्लुकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे निर्जलीकरण होते आणि तहान वाढते.
वारंवार लघवी होणे-
रात्रभर किंवा सकाळी उठल्यावर वारंवार लघवी होणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे एक सामान्य लक्षण आहे. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्त असते तेव्हा मूत्रपिंड ते फिल्टर करण्यासाठी अधिक मेहनत घेतात. ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला रात्री अनेक वेळा बाथरूममध्ये जावे लागत असेल, तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे-
सकाळी उठल्यानंतरही जर तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटत असेल, तर ते रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे असू शकते. जेव्हा साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीराच्या पेशी ग्लुकोजचे उर्जेमध्ये रूपांतर करू शकत नाहीत. ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळत नाही आणि थकवा येतो.
धूसर दृष्टी किंवा डोळ्यांना त्रास-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांवरही परिणाम होतो. सकाळी उठल्यावर जर तुम्हाला धूसर दृष्टी किंवा डोळ्यांमध्ये जळजळ जाणवत असेल तर ते रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने लेन्सला सूज येऊ शकते. ज्यामुळे दृष्टीच्या समस्या निर्माण होतात. दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रेटिनोपॅथीसारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.
डोकेदुखी किंवा चक्कर येणे-
सकाळी उठल्यावर डोकेदुखी किंवा चक्कर येणे हे देखील रक्तातील साखरेच्या उच्च पातळीचे लक्षण असू शकते. निर्जलीकरण आणि साखरेच्या पातळीत चढ-उतार डोकेदुखीचे कारण बनू शकतात. जर ही लक्षणे वारंवार आढळत असतील तर तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी करणे महत्वाचे आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)