Diwali Faral Recipes: अनारसे कधी कडक तर कधी वातड बनतात, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास बनतील अगदी एकदम खुसखुशीत

अनारसे अनेकदा बिघडतात. कधी कडक तर कधी वातड बनतात. त्यामुळे अनेकजण अनारसे करणेच टाळतात.

Anarase Marathi recipe:  देशभरात दिवाळीची धामधूम दिसून येत आहे. लोक खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. कपड्यांपासून ते घराच्या सजावटीपर्यंत विविध साहित्याची जोरदार खरेदी केली जात आहे. दिवाळीमध्ये आणखी एक गोष्टीची घाई दिसून येते. ती म्हणजे फराळ बनवण्याची. दिवाळीत फराळाला विशेष महत्व आहे. फराळामध्ये लाडू, चिवडा आणि चकलीसोबतच अनारसेसारखे अनेक वेगवेगेळे पदार्थ बनवले जातात.

नोकरी करणाऱ्या अनेक महिला बाहेरून फराळ खरेदी करतात. परंतु अनेक महिला अशा असतात ज्यांना घरीच फराळ बनवणे उत्तम वाटते. परंतु अनेकांना फराळाचे काही पदार्थ फसतात. कितीही प्रयत्न करून हे पदार्थ हवे तसे बनत नाहीत. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे अनारसे होय. अनारसे करणे तसे अनेकांना फारच किचकट वाटते.

अनारसे अनेकदा बिघडतात. कधी कडक तर कधी वातड बनतात. त्यामुळे अनेकजण अनारसे करणेच टाळतात. परंतु काही सोप्या टिप्स फॉलो करून अनारसे बनवल्यास एकदम मऊ आणि खुसखुशीत बनतील. चला पाहूया एकदम सोपी रेसिपी…..

 

अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

तांदळाची पिठी- ३ ते ४ कप

गूळ- १ कप

खसखस- आवश्यकतेनुसार

तेल- तळण्यासाठी

तूप- गरजेनुसार

 

अनारसे बनवण्याची रेसिपी-

 

-सर्वप्रथम अनारसे बनवण्यासाठी जुना तांदूळ घ्या. नवे तांदूळ अजिबात घेऊ नका. तांदूळ घेऊन ते २ ते ३ पाण्याने धुवून नंतर त्यात पाणी घालून ठेवा. असे सलग ३ ते ४ दिवस एकसारखे करा.

-चार दिवसांनंतर भिजवलेले तांदूळ घेऊन ते चांगल्या सुती कापडाने पुसून वाळवून घ्या. आता त्याची मिक्सरमध्ये चांगली पिठी बनवून घ्या.

– तयार केलेल्या पिठीमध्ये गूळ घालून चांगले एकजीव करा. आता या पिठाचे एकसारखे गोळे बनवून घ्या. हे गोळे ३ ते ४ दिवस एका हवाबंद डब्यात घालून ठेवा.

-नंतर अनारसे बनवताना हे गोळे घेऊन एकसारखे पुरीसारखे बनवून घ्या. या पुरीला एका बाजूने खसखसमध्ये बुडवून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून ते चांगले खरपूस तळून घ्या.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News