Shrikhand recipe Marathi: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सर्वांचीच लगबग सुरु झाली आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वजणच खरेदीपासून ते सजावटीपर्यंत सर्वकाही आवडीने करत आहेत. दिवाळीमधील एक महत्वाचा भाग म्हणजे फराळ आणि खानपान होय. यामध्ये चिवडा, करंज्या, चकली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूंचा समावेश होतो. तर दुसरीकडे जेवणामध्येही गोड पदार्थ बनवले जातात. यामध्ये श्रीखंड आवर्जून बनवले जाते.
अनेक महिलांना श्रीखंड घरी बनवता येत नाही. परंतु मार्केटसारखे श्रीखंड घरी बनवणे अगदी सोपे आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला तुम्ही अगदी सहजपणे घरीच श्रीखंड बनवू शकता. चला पाहूया श्रीखंडाची सोपी रेसिपी……

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
दही- ५०० ग्रॅम
साखर- ३ ग्रॅम
वेलचीपूड
गुलाबजल
केशर
दूध- इच्छेनुसार
आयसिंग शुगर- १५० ग्रॅम
ड्रायफ्रूट्स- बारीक चिरून
श्रीखंड बनवण्याची पारंपरिक रेसिपी-
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम, दही घेऊन ते चांगले फेटून घ्यावे. दह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आता केशर घेऊन ते दुधामध्ये भिजवून बाजूला ठेवावे. केशरमुळे श्रीखंडला चांगला रंग येतो.
आता फेटलेल्या दह्यामध्ये आयसिंग शुगर, वेलचीपूड, साखर, गुलाबजल मिसळून एकजीव करावे.
नंतर त्यावर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले सजवावे.
अशाप्रकारे तुमचे घरचे श्रीखंड तयार आहे. हे तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊनही थंड करू शकता.
श्रीखंड खाण्याचे फायदे-
श्रीखंड हे दह्यापासून बनलेले असल्याने ते पोटाच्या समस्येवर अत्यंत गुणकारी असते. श्रीखंड खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
दही हा कॅल्शिअमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे दहापासून बनलेले श्रीखंड खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
श्रीखंड बराचवेळ पोट भरलेले ठेवते त्यामुळे आहारात श्रीखंड खाल्ल्याने जादाचे खाणे होत नाही.











