दसऱ्याआधी पार्लरमध्ये जायला वेळ नाही मिळाला? ‘या’ उपायाने घरातच मिळेल उत्तम ग्लो

सणासुदीत महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात.

Home remedies for facial Glow:  सणासुदीत अनेकदा तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. पण वातावरणात असलेली धूळ आणि घाण, प्रदूषणाचे कण, बदलते हवामान, हे सर्व न थांबता आपले काम करत राहतात आणि तुमच्या त्वचेचा रंग गडद होत जातो.

सणासुदीत महिला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. आता दसऱ्यालासुद्धा अनेकजण कामाच्या व्यापातून पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. घरात काही सोपे उपाय करून तुम्ही पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता…..

 

बेसनचा फेसपॅक –

चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी बेसन, हळद आणि दही यांचे मिश्रण बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि स्क्रब करा. ते १५ मिनिटे सुकू द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे, छिद्र आतून स्वच्छ होतात आणि चेहरा थोड्याच वेळात गोरा दिसू लागतो.

टोमॅटोने स्क्रब करा-
संवेदनशील त्वचेसाठी हा फेस पॅक खूप प्रभावी आहे. यासाठी प्रथम टोमॅटोचा गाभा काढा. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला आणि चांगले मिसळा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवा.

मैदा-
मैदा त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. ज्यामुळे त्वचेचे छिद्र पूर्णपणे स्वच्छ होतात. ते खोलवर जाते आणि छिद्रे साफ करते. फेस पॅक बनवण्यासाठी, मैदा, टोमॅटो, दही, मध आणि दुधाची पावडर मिसळा. हा मास्क तुमच्या त्वचेवर लावा आणि पूर्णपणे कोरडा होऊ द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

 

दह्याने चेहऱ्याचा मसाज करा-

तुमचा चेहरा गोरा करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. यासाठी थोडे दही घ्या आणि चेहऱ्याला मसाज करा. नंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा. काहीच दिवसांत तुम्हाला त्वचेच्या रंगात फरक दिसू लागेल.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News