Benefits of eating curry leaves on an empty stomach in the morning: तुम्हाला माहिती आहे का दररोज सकाळी कढीपत्ता चावून खाल्ल्याने काय फायदे मिळतात. कढीपत्ता केवळ अन्नाची चवच वाढवत नाही. तर आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत फादेशीर आहे. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी शरीराला अनेक फायदे देतात.त्यामुळे दररोज सकाळी ४-५ कढीपत्ता चावून खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात जाणून घेऊया….
पचनक्रिया मजबूत बनते-
कढीपत्त्यामध्ये फायबर आणि अँटी-इंफ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच त्याचा सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारते.
वजन कमी करण्यास मदत करते-
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता हा एक नैसर्गिक उपाय आहे. कारण कढीपत्ता शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते आणि अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे वजन वेगाने कमी होणेस मदत होते. शिवाय ते सतत खाण्याची आणि गोड खाण्याची लालसा कमी करते.
मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते-
आयुर्वेदानुसार, कढीपत्त्यामध्ये हायपोग्लायसोमिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रॉडक्शन वाढते. याचा डायबिटीस रुग्णांना फायदा होतो. डायबिटीस रुग्णांनी नियमित याचे सेवन केल्यास ग्लुकोज लेव्हल बॅलेन्स राहते.
डोळ्यांसाठी फायदेशीर-
कढीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन्स ए भरपूर प्रमाणात असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फादेशीर आहे. त्यामुळे डोळ्यांच्या अनेकसमस्या दूर होतात. शिवाय डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
केसांसाठी फायदेशीर-
कढीपत्ता केस गळणे कमी करते. केसांच्या वाढीस मदत करते. यामध्ये आयर्न, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केसांच्या योग्य वाढीस मदत होते. त्याच्या सेवनाने केस मजबूत आणि चमकदार बनतात.
कढीपत्ता कसा खावा?
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ४-५ कढीपत्ता चावून खाऊ शकता किंवा ते पाण्यात उकळून पिऊ शकता. या दोन्ही पद्धती तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, जर तुम्हाला आधीच कोणतीही आरोग्य समस्या असेल किंवा तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांना विचारल्यानंतरच ते तुमच्या आहारात समाविष्ट करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





