प्रोटीन वाढवण्यासाठी नियमित खा हिरवे वाटाणे, जाणून घ्या विविध फायदे

हिरवे वाटाणे फक्त विविध पदार्थांची लज्जत वाढवत नाहीत तर ते अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर ठरतात.

Benefits of eating green peas:    आपल्याला आहारात विविध पदार्थांची भाजी खायला आवडते. त्यातीलच एक म्हणजे हिरवे वाटाणे होय. अनेकांना हिरवे वाटाणे कच्चे खायला आवडतात. हिरवे वाटाणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असतात. पण आता पावसाळ्यातसुद्धा हिरवे वाटाणे मिळायला सुरुवात झाली आहे. हिरवे वाटाणे खायला अतिशय चविष्ट असतात.

पण तुम्हाला माहिती आहे का, हिरवे वाटाणे खाल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आजपर्यंत आपण हिरव्या वाटण्यापासून बनणारे अनेक पदार्थ पहिले असतील. परंतु आज आपण हिरवे वाटणे खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आहारात हिरवे वाटाणे समाविष्ट करण्याचे फायदे काय आहेत.

 

प्रोटीनसाठी फायदेशीर-

हिरव्या वाटाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. वाटणे हा वनस्पती-आधारित प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे. हृदयाच्या स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन खूप आवश्यक असते. यासोबतच, शरीराच्या स्नायूंसाठी देखील प्रोटीन खूप आवश्यक असते.

बद्धकोष्ठता दूर होते-
हिरव्या वाटाण्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, फायबरमुळे अन्न आतड्यांमध्ये योग्य हालचाल करण्यास मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्या टाळता येतात. पावसाळ्यात बद्धकोष्ठतेच्या तक्रारी वाढतात. त्यामुळेच वाटाणे यापासून आराम देण्यास मदत करू शकतात.

मधुमेह नियंत्रित करते-
रक्तातील साखर वाढल्याने डायबिटीसचा धोका असतो. हिरवे वाटाणे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. हिरव्या वाटण्यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत. त्यामुळे साखर नियंत्रित करण्यासाठी हिरवे वाटणे अत्यंत फायदेशीर आहेत.

 

व्हिटॅमिन्सचा चांगला स्रोत-

हिरव्या वाटानाण्यांमध्ये व्हिटॅमिन्स सी, व्हिटॅमिन्स ए, जिंक आणि विविध पोषक तत्वे आढळतात. ज्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास विविध आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हिरवे वाटाणे खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

त्वचेसाठी फायदेशीर-
हिरव्या वाटाण्यांमध्ये अँटी-ऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असल्याने ते त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरवे वाटाणे खाल्ल्याने त्वेचवरील सुरकुत्या दूर होतात. चेहरा चमकदार बनतो. शिवाय केस गळणे कमी होतात. आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News