How to Black White Hair Naturally: केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. जी वयानुसार दिसून होते. परंतु ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांमुळे, लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. यामुळे, लोक अधिक काळजीत पडतात आणि अनेकदा रासायनिक रंगांचा वापर करतात. हे रासायनिक रंग केवळ थोड्या काळासाठी पांढरे केस लपवतात आणि ते नुकसान देखील करतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जे पांढरे केस काळे करण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊया त्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.

आवळा आणि बदाम तेल-
बदाम आणि आवळा दोन्ही केसांसाठी खूप चांगले पोषक आहेत. यासाठी एक चमचा बदाम तेल आणि एक चमचा आवळा तेल मिसळा आणि ते हलके गरम करा. आता ते तुमच्या केसांवर ३० मिनिटे राहू द्या. नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा ते वापरावे. यामुळे तुमचे केस पांढरे होणे कमी होईल आणि ते नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल.
कॉफी-
कॉफीमध्ये असलेले घटक केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करतात. कॉफी पाण्यात उकळून केस धुतल्याने केसांचा रंग काळा होऊ शकतो. त्यामुळे केसांचे कोणते नुकसानही होत नाही.
हळद-
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्यामध्ये हळद मिसळून केसांना लावल्याने केसांचा रंग काळा होऊ शकतो.
बदामाचा वापर-
नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा. नंतर त्याची पेस्ट बनवा आणि ती दूध किंवा दह्यामध्ये मिसळा आणि व्यवस्थित केसांना लावा. हे नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस दाट आणि लांबलचक ठेवते. शिवाय केस काळे करण्यासही मदत करते.
कांद्याचा रस-
कांद्यामध्ये सल्फर असते. जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. आणि केस काळे करण्यास मदत करते. कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांचा रंग काळा होऊ शकतो.
मेथी आणि बदाम-
नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी बदाम आणि मेथी बारीक करून त्याची बारीक पेस्ट बनवा. नंतर ते केसांना लावा आणि ३० मिनिटांनी पाण्याने धुवा. हे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवते. तसेच कोंडा आणि केस गळणे यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. शिवाय केस काळे बनवते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)