Hanuman Jayanti Marathi Status: शनिवार, १२ एप्रिल रोजी देशभरात ‘हनुमान जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी लोक भगवान रामाच्या अनुयायांची पूजा करतात. जर तुम्हीही पवनपुत्र हनुमानाचे भक्त असाल आणि तुमच्या जवळच्या मित्रांना आणि आणि प्रियजनांना या शुभ प्रसंगी संदेशांद्वारे शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर तुम्ही हे भक्ती संदेश पाठवू शकता.
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश-
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!