Idli Vs Upma: सकाळचा नाश्ता दिवसभराच्या एनर्जीसाठी अत्यंत आवश्यक असतो. सकाळचा नाश्ता पोषणयुक्त असायला हवा. काही लोक सकाळच्या नाश्त्याची सुरुवात हेल्दी आणि लाइट नाश्त्याने करतात. ज्यामध्ये ते पोहे, इडली, उपमा सारख्या पदार्थांचा समावेश करतात. इडली आणि उपमा दोन्ही नाश्त्यामध्ये पोषण तत्व मुबलक प्रमाणात असतात. दक्षिण भारतात हे दोन्ही नाश्त्याचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. आता तर भारतातील अनेक भागात हे दोन्ही पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
इडली आणि उपमा हे आरोग्यदायी नाश्त्याच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. फिटनेसप्रेमी हे दोन्ही नाश्ते मोठ्या आवडीने खातात. मात्र दोन्ही पदार्थांच्या पोषक तत्वांमध्ये काही फरक आहे. या लेखात आपण तेच जाणून घेऊया.

इडली आणि उपम्यामध्ये कोणता नाश्ता अधिक आरोग्यदायी?
पोषण तत्वांनी युक्त इडली
इडली तांदूळ आणि उडदाची डाळ किंवा रवा यापासून तयार केली जाते. हा नाश्ता हलका आणि पोषणतत्वांनी भरपूर असतो. इडली कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय यात प्रोटीन, डायटरी फायबर, आर्यन, विटॅमिन बी आणि कॅल्शियम असतं. वजन कमी करणाऱ्यांसाठी इडली हा चांगला पर्य़ाय आहे. यामध्ये तेल, मसाले नसतात. स्टिमने शिजवलं जातं. यामध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. एक मीडियम साइजची इडली ३५ ते ३९ कॅलरीजची असते.
फायबरयुक्त उपमा
उपम्यायमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅटसारखे पोषक तत्व आढळतात. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आढळतात. ज्यामुळे पोषणतत्व वाढतात. उपमा फायबरचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे पचनासाठी सोपा. बराच काळ पोट भरलेलं राहतं. फाय़बर असल्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आगे. आर्य़न असल्याने अॅनिमियाच्या लोकांसाठी हा उपयुक्त आहे. एक कप उपमा तब्बल १२० कॅलरीजचा असतो. उपम्यामध्ये तुम्ही कोणते पदार्थ टाकता यावरुन त्याची कॅलरीज कमी-जास्त होऊ शकतात.
इडली आणि उपम्यामध्ये जास्त हेल्दी काय आहे?
तसं पाहता इडली आणि उपमा दोन्हीही पदार्थ चांगलेच आहेत. मात्र कोणा एकाची निवड करायची असेल तर इडली अधिक फायदेशीर आहे. इडलीसाठी तेलाचा वापर करावा लागत नाही. यामध्ये आंबवलेल्या पदार्थांचा वापर होतो. इडली लो फॅट आणि प्रोबायोटिकयुक्त आहे. तसं पाहता उपमादेखील चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर भाज्या वापरल्या तर यातील पोषण मूल्य वाढतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











