मायक्रोव्हेव, ओटीजी आणि एअर फ्रायर यामध्ये फरक काय? कोणतं उपकरण तुमच्यासाठी Best?

Smita Gangurde

Difference Between OTG, Oven And Air Fryer: सद्यस्थितीत स्वयंपाकघरात विविध प्रकारची आधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही जलद गतीने आणि सहज स्वयंपाक करू शकता. मात्र अनेकांना मायक्रोव्हेव, ओटीजी आणि एअर फ्रायर यामधील फरक लक्षात येत नाही. आज आपण याचा वापर आणि उपयुक्ततेबद्दल सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही कुटुंब आणि लाइफस्टाइलनुसार उपकरण निवडाल.

मायक्रोव्हेव (Microwave)

मायक्रोव्हेव (Microwave) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर कमी करतो. यामुळे अन्नातील पाण्याचे अणु वायब्रेट करीत आतून अन्न गरम करतो. लवकर अन्न गरम करायला याचा वापर केला जातो. किंवा लवकरच स्वयंपाक करायचा असल्यास, फ्रोजन फूडसाठी मायक्रोव्हेवचा वापर केला जातो. याची किंमत पाच ते सात हजारांमध्ये असते, आणि २० ते २५ लिटर कॅपिसिटीचं मॉडेल घरात दररोजच्या वापरासाठी अत्यंत योग्य आहे.

OTG (ओवन, टोस्टर और ग्रिलर)

OTG (Oven, Toaster and Griller) मध्ये वर आणि खाली गरम करण्याचे सेंटर्स असतात. ज्यामुळे हवा गरम होते आणि अन्न शिजतं. हे उपकरण बेकिंग, टोस्टिंग आणि ग्रिलिंगसाठी सर्वात चांगलं आहे. ओटीजीमध्ये केक, पिज्जा, ब्रेड, भाज्या आणि मीट ग्रीज करणं सोपं जातं. याची क्षमता १० लिटर ते ८० लिटरपर्यंत असते. ज्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करायची आवड असेल त्यांच्यासाठी OTG बेस्ट आहे.

एअर फ्रायर (Air Fryer)

एअर फ्रायर्स अन्नाभोवती गरम हवा वेगाने फिरवतात, ज्यामुळे जास्त तेल न वापरता ते कुरकुरीतपणे शिजतात. फ्रेंच फाइज, समोसा, चिकन विंग्ज, ब्रेड रोल, पिझ्झा याशिवाय केक आणि मफिनदेखील एअर फ्रायरमध्ये तयार करू शकता. हेल्दकडे जास्त लक्ष देणाऱ्यांसाठी एअर फ्रायर आयडियल आहे. याची क्षमता ४ ते १५ लिटर असते आणि किंमत ४ ते १० हजारांदरम्यान असते.

प्रत्येक उपकरणाचे स्वतःचे फायदे आहेत. जर तुम्हाला अन्न लवकर गरम करायचे असेल तर मायक्रोवेव्ह हा सर्वोत्तम पर्याय आहे, बेकिंग आणि ग्रिलिंगसाठी OTG आहे आणि तळणीचं खाऊनही निरोगी राहण्यासाठी एअर फ्रायर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या कुटुंबाच्या गरजांनुसार तुम्ही सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.

 

 

ताज्या बातम्या