MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Independence Day 2025: स्वातंत्र्यानंतर तयार झालेले भारतातील १० मोठे कायदे कोणते?

Written by:Smita Gangurde
Published:
स्वातंत्र्यानंतर आणि राज्यघटना लागू होण्यापूर्वी अनेक कायदे तयार करण्यात आले. ज्यावर आजही देशाची व्यवस्था उभी आहे.
Independence Day 2025: स्वातंत्र्यानंतर तयार झालेले भारतातील १० मोठे कायदे कोणते?

15 ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या अत्याचारातून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं आव्हान होतं एक मजबूत प्रशासकीय आणि कायदेशीर संरचनेची. नव्या भारताला अशा कायद्यांची आवश्यकता होती, जे नागरिकांचे अधिकार ठरवतील. सरकारची जबाबदारी अधोरेखित करेल आणि देशात व्यवस्था निर्माण करेल. याच कारणास्तव स्वातंत्र्यानंतर आणि राज्यघटना लागू होण्यापूर्वी अनेक कायदे तयार करण्यात आले. ज्यावर आजही देशाची व्यवस्था उभी आहे.

१९४७ ते १९५५ दरम्यान बनवण्यात आलेल्या या कायद्यांमध्ये सामाजिक न्याय, कामगार हक्क, प्रशासन, भाषा, नागरिकत्व आणि वैयक्तिक कायदे यासारख्या विषयांचा समावेश होता. यातील काही कायदे ब्रिटिश काळातील कायद्यांची सुधारित आवृत्ती होते, तर काही पूर्णपणे नवीन होते. या कायज्यांनी भारताला लोकशाहीला आकार देण्याची महत्त्वाची भूमिका निभावली. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि एक नव्या राष्ट्राच्या रुपात सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय रचना मजबूत करण्याचं आव्हान देखील होतं.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार झालेले १० कायदे…

राज्यघटना लागू होण्यापूर्वी (२६ जानेवारी १९५०) आणि त्यानंतर संसदेने अनेक कायदे तयार केले. ज्यांचा उद्देश नव्या लोकशाहीत चांगली व्यवस्था, विकास आणि नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा सुनिश्चित केलेली असेल. हे कायदे शिक्षण, श्रम, भूमी सुधारणा, नागरिकांचे अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सारख्या क्षेत्रातील आहे. स्वातंत्र्यानंतर कोणते १० कायदे तयार करण्यात आले होते…

१. भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७
ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र अधिराज्य म्हणून स्थापित केले जातात. या अंतर्गत गव्हर्नर जनरल आणि प्रांतीय सरकारांचे अधिकार परिभाषित केले गेले.

२. औद्योगिक विवाद कायदा, १९४७
कामगार आणि मालकांमधील वाद सोडवण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. त्यात मध्यस्थी आणि कामगार न्यायालयाची तरतूद आहे.

३. फॅक्ट्री कायदा, १९४८
कारखान्यातील कामगारांच्या कामाची परिस्थिती, कामाचे तास, सुरक्षितता आणि आरोग्याशी संबंधित नियम निश्चित करण्यात आले.

४. किमान वेतन कायदा, १९४८
कामगारांना निर्धारित किमान वेतन देण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही संरक्षण मिळाले.

५. भाषा कायदा, १९४८
सरकारी कामासाठी हिंदी आणि इंग्रजीला मान्यता देणारा हा कायदा अंतरिम व्यवस्था म्हणून लागू करण्यात आला.

६. नागरिकत्वासाठी सुरुवातीच्या तरतुदी..

स्वातंत्र्यानंतर, नागरिकत्व निश्चित करण्यासाठी तात्पुरते नियम बनवण्यात आले, जे नंतर भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये कायमस्वरूपी करण्यात आले.

७. सार्वजनिक कर्ज कायदा (सुधारणा)
स्वतंत्र भारतात सरकारी कर्ज, बाँड आणि गुंतवणुकीशी संबंधित तरतुदी निश्चित करण्यात आल्या.

८. संधीच्या समानतेसाठी सुरुवातीचे कायदे..
नोकरीतील भेदभाव संपवण्यासाठी एक सुरुवातीची कायदेशीर चौकट तयार करण्यात आली. जे नंतर संविधानात अधिकार म्हणून समाविष्ट करण्यात आले.

९. राष्ट्रपती आणि राज्यपालांचा वेतन कायदा, १९५१
उच्च संवैधानिक पदांचे वेतन, भत्ते आणि सुविधा निश्चित करणारा कायदा.

१०. हिंदू विवाह कायदा, १९५५
हिंदू विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह आणि हुंडा यासारख्या समस्यांसाठी आधुनिक कायदेशीर व्यवस्था.