MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

महाराष्ट्रातील या शहरात १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंगा फडकवला गेला नव्हता, या झेंड्याने घेतली होती त्याची जागा

Published:
महाराष्ट्रातील या शहरात १५ ऑगस्ट १९४७ रोजी तिरंगा फडकवला गेला नव्हता, या झेंड्याने घेतली होती त्याची जागा

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारतात अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची लाट उसळली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात असे एक शहर होते जिथे त्या दिवशी तिरंगा फडकवण्यात आला नव्हता? हो, आज आपण त्या शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी वेगळा ध्वज फडकवण्यात आला होता.

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या शहरात तिरंगा फडकला नव्हता

छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानाचा भाग होतं आणि 1960 साली ते महाराष्ट्रात समाविष्ट झालं.

15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असताना, हैदराबाद संस्थानात मात्र निजामाचं शासन होतं. निजाम उस्मान अली खान याने भारतात विलीनीकरणास नकार दिला आणि आपली रियासत स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी हैदराबादमध्ये तिरंग्याऐवजी निजामांचा ‘आसफिया’ झेंडा फडकवण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर हे शहर हैदराबाद संस्थानाचा भाग होतं

हैदराबाद हे संस्थान भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशा काही संस्थानांपैकी एक होतं, ज्यांना भारतात की पाकिस्तानात विलीन व्हायचं हे ठरवायचं होतं. हैदराबादच्या निजामाने भारतात विलीनीकरणास नकार दिला आणि स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली.

या कारणामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आणि त्यानंतर १९४८ पर्यंत हैदराबादमध्ये तिरंगा फडकवण्यात आला नाही. निजामाच्या राजवटीमुळे स्थानिक जनतेला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यास मनाई होती. त्या काळात फक्त निजामाचा ध्वज  ‘असफिया ध्वज’  फडकवण्यात येत होता. या ध्वजावर पिवळ्या पार्श्वभूमीवर हिरवा आणि पांढरा रंग असलेला डिझाइन होता, जो त्या संस्थानाची ओळख होता.

तरीही, स्थानिक लोकांमध्ये स्वातंत्र्याची तीव्र भावना होती. अनेक संघटना आणि स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवला आणि अखेर १९४८ मध्ये पोलिस कारवाईनंतर हैदराबाद भारतात विलीन झाले.

भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ सुरू केले

स्वातंत्र्यानंतर सुमारे एक वर्षापर्यंत हैदराबाद भारताचा भाग नव्हता. २१ जून १९४८ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या राजीनाम्यानंतर तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक धाडसी निर्णय घेतला. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ सुरू केले, त्यानंतर हैदराबाद राज्य भारतात विलीन झाले. त्यानंतरच हैदराबादमध्ये पहिल्यांदाच तिरंगा फडकवण्यात आला.