नवरात्र आपल्या देशातील एक पवित्र आणि उत्साहपूर्ण सण आहे. हे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. घरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीसाठी दिवा प्रज्वलित ठेवला जातो. मात्र यादरम्यान कित्येक महिलांना त्रास होऊ शकतो. नवरात्रौत्सवात मासिक पाळी आली तर अनेक महिलांना अस्वस्थ वाटू लागतं. मासिक पाळीदरम्यान पूजा कशी करावी असा संभ्रम निर्माण होतो. मात्र, खरंच मासिक पाळीदरम्यान पूजा करणं योग्य आहे की नाही? धर्मगुरू प्रेमानंद महाराज यांनी या मुद्द्यावर आपले विचार शेअर केले आहेत. या लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
प्रेमानंद महाराज काय सांगतात?
अनेकांना वाटतं की, मासिक पाळीदरम्यान पूजा करू नये. मात्र प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं, एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, मासिक पाळीदरम्यान पूजा करणं काहीही चुकीचं नाही. देवी दू्र्गा प्रत्येकाच्या मनातलं वाटू शकते. जर तुम्ही मनापासून पूजा केली तर देवी नक्की त्याचा स्वीकार करेल. जर तुम्हाला नवरात्रौत्सवात तुम्हाला मासिक पाळी सुरू झाली तरीही मन:पासून पूजा करा, देली तुम्हाला साथ देईल.

डॉक्टर काय सांगतात…
मासिक पाळीदरम्यान पूजा करू शकता. मासिक पाळी ही एक प्राकृतिक प्रक्रिया आहे. जी प्रत्येक महिला आणि मुलीच्या शरीरात होते. हे काही घाणेरडं किंवा अशुद्ध रक्त नाही. मासिक पाळीतील रक्त अशुद्ध नसते, हा समज चुकीचा आहे. मूल जन्माला घालता यावं यासाठी प्रत्येक स्त्रीच्या शरीरात काही बदल होतात. मासिक पाळी हा त्याचाच एक भाग आहे.
मासिक पाळी दरम्यान पूजा करण्याची पद्धत l Periods madhe puja kashi karal
स्वच्छता: पूजा करण्यापूर्वी हात आणि शरीर पूर्णपणे धुवा. स्वच्छ कपडे घाला.
पूजेचे ठिकाण स्वच्छ ठेवा: पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा. देवीचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
मनापासून पूजा करा: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मन देवीच्या भक्तीने भरलेले आहे. काहीही मागा किंवा मनापासून तिचे आभार माना.
ताजी फुले, हार किंवा अगरबत्ती लावा: पूजा करताना फुले, अगरबत्ती, दिवे आणि पाणी अर्पण करा. देवीला हे सर्व आवडते.
आरती गा किंवा ऐका: तुम्ही आरती गाऊ शकता किंवा मंदिरात वाजवले जाणारे स्तोत्र ऐकू शकता.
देवीचे ध्यान करा आणि पूजा करा: काही मिनिटे देवीचा विचार करा आणि मनापासून प्रार्थना करा.











