What to do if throat is swollen: पावसाळ्यात कधी पाऊस, कधी ऊन तर कधी थंडी असं वातावरण दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे घसा खराब होणे, सर्दी-ताप येणे अशा समस्या दिसून येतात. पावसाळ्यातसुद्धा सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशावेळी बोलणे तर दूरच परंतु खाणेपिणे आणि गिळणेसुद्धा कठीण होते. त्यामुळे लोक विविध औषधे घेतात. परंतु सतत औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय करणे योग्य असते. त्यामुळेच आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया…
आले-
घशाच्या तक्रारींवर आलेसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. आल्यामध्येसुद्धा अँटी इंफ्लीमेंट्री गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील सूज कमी होऊन वेदना कमी होतात. आल्याचा एक तुकडा चावून खाल्य्याने किंवा आल्याचा चहा आणि काढा पिल्यानेसुद्धा फायदा मिळतो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाचे विकारसुद्धा दूर होतात. त्यामुळे घसा दुखत असल्यास आल्याचा वापर नक्की करावा.
मध-
आयुर्वेदानुसार मध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. मधामध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. घशाच्या समस्येमध्येसुद्धा मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. अशावेळी दिवसातून दोनवेळा मधासोबत मुलेठी पावडर मिसळून खाल्ल्यास घशाला आराम मिळतो. घशाची सूज कमी होते. तसेच घसा खरखरणेही कमी होते.
काळी मिरी-
पावसाळ्यात घसा दुखत असल्यास किंवा घशात खरखर होत असल्यास काळी मिरी फारच उपयुक्त ठरते. काळ्या मिरीमध्ये अँटी इंफ्लीमेंट्री आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन दूर होऊन घसा साफ होण्यास मदत होते. त्यामुळे घसा दुखत असल्यास मधासोबत काळ्या मिरीचे सेवन करावे.
डाळ-
पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याकाळात तेलकट आणि जास्त मसालेदार अन्न खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे पावसाळ्यात डाळ खाणे जास्त फायदेशीर ठरते. डाळीला आले आणि लसणाचा तडका देऊन खाल्याने घशाला आराम मिळतो. तुम्ही वाटीभर डाळ पिऊ शकता.
पालेभाज्यांचा सूप-
पावसाळ्यात मसालेदार अन्न खाण्याऐवजी पालेभाज्या आणि पालेभाज्यांचा सूप खाणे चांगले असते. पावसाळ्यात घसा दुखत असल्यास पालेभाज्यांचा सूप करून प्या. त्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि घशाला आरामही मिळते. त्यामुळे सूपचे सेवन करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





