Kairi Panha: थंडगार कैरीचं पन्हं कसं बनवायचं? इथे पाहा एकदम सोपी रेसिपी

Aiman Jahangir Desai

How to make Kairi Panha:  उन्हाळा आला की आपल्याला कैरीचं थंडगार पन्हं आठवायला लागतं. फक्त उन्हाळ्याच्या हंगामातच बाजारात आंब्याची मुबलकता दिसून येते. आंब्यापासून अनेक प्रकारच्या पाककृती तयार केल्या जातात. परंतु आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेल्या कैरीच्या पन्ह्याची चव आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. कडक उन्हात, कैरीचे पेय केवळ शरीराला थंडावा देत नाही तर उष्माघात टाळण्यास देखील मदत करते. प्रौढ असोत किंवा मुले, सर्वांनाच आंब्याच्या पेयाची चव आवडते. ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे. कैरीचे पन्हे बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती कमी वेळात तयार होते. जर तुम्हालाही थंडगार कैरीचे पन्हे बनवायचे असेल तर ही सोपी आणि सुटसुटीत रेसिपी फॉलो करा.

साहित्य-

-१ वाटी कच्च्या कैरीचा गर
-२ वाट्या गूळ
-१/२ टीस्पून वेलपूड
-१ टीस्पून भाजलेली जिरेपूड
-७-८ पुदिन्याची पाने
-१/४ टीस्पून काळे मीठ
-१/४ टीस्पून साधे मीठ
-गरजेनुसार पाणी

रेसिपी-

स्टेप १-
कैरीचं पन्हं बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्चा आंबा धुवून शिजवून घ्या.स्टेप २-
साहित्यात घेतलेला गूळ किसून घ्या.स्टेप ३-
कैरी शिजल्यानंतर त्याचा गर काढा.स्टेप ४-
आता मिक्सरमध्ये कैरीचा गर, गूळ, वेलची पावडर, काळे मीठ, साधे मीठ, भाजलेले जिरे पावडर टाका आणि चांगले बारीक करा.

स्टेप ५-
आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी मिसळा आणि चाळणीतून गाळून घ्या.

स्टेप ६-
नंतर फ्रिजमध्ये थंड करून किंवा बर्फाचे तुकडे टाकून थंडगार आंब्याचं पन्ह सर्व्ह करा.

ताज्या बातम्या