लघवीत दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात किडनी खराब होण्याची लक्षणे, जाणून घ्या

Aiman Jahangir Desai

Symptoms of kidney damage in urine:   खराब आहार आणि जीवनशैलीमुळे किडनीवर खूप दबाव येतो. खरं तर, किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. पण जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील, तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

परंतु, जेव्हा किडनी डॅमेज होते तेव्हा आपले शरीर काही सिग्नल देते, ज्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्याची काही चिन्हे लघवीमध्ये देखील दिसतात. जर तुम्हाला लघवीमध्ये ही लक्षणे दिसली तर तुम्ही समजून घ्यावे की किडनी खराब होत आहे आणि तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा….

 

लघवीच्या रंगात बदल-

सामान्य लघवी हलकी पिवळी किंवा पारदर्शक असते. परंतु, जर लघवीचा रंग गडद पिवळा, लाल, तपकिरी किंवा कोलासारखा झाला तर ते किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते.

लाल किंवा गुलाबी लघवी – हे लघवीमध्ये रक्तामुळे असू शकते, जे किडनी स्टोन, संसर्ग किंवा किडनीच्या नुकसानाचे लक्षण आहे.
फेसाळ लघवी – जर लघवीला फेस येत असेल, तर ते प्रथिन गळतीचे लक्षण असू शकते, जे किडनीच्या कार्यात बिघाड दर्शवते.

लघवीत जळजळ किंवा वेदना होणे-
लघवी करताना वेदना किंवा जळजळ मूत्रमार्गाच्या संसर्गाचे (यूटीआय) किंवा मूत्रपिंडातील खड्यांचे लक्षण असू शकते. जर ही समस्या कायम राहिली तर मूत्रपिंडाचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.

 

लघवीतून दुर्गंधी येणे-

सामान्य लघवीला सौम्य वास येतो, परंतु जर लघवीला तीव्र किंवा असामान्य वास येत असेल तर ते संसर्गाचे किंवा मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते.

लघवीत प्रथिने किंवा साखरेचे प्रमाण वाढणे-
किडनी रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करतात. परंतु जेव्हा मूत्रपिंडाचे नुकसान होते तेव्हा प्रथिने आणि साखर लघवीतून बाहेर पडते. या स्थितीला प्रोटीनुरिया आणि ग्लुकोसुरिया म्हणतात, जे मधुमेहामुळे होऊ शकते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या