Kulfi Recipe: घरच्या घरीच बनवा दूध कुल्फी, इथे पाहा साहित्य आणि रेसिपी

Aiman Jahangir Desai

How to make Kulfi at home: उन्हाळा सुरु आहे आणि त्यात चविष्ट कुल्फी खायला कोणाला आवडणार नाही.   जर तुम्हाला कुल्फी खायची इच्छा असेल तर तुम्ही घरी ते करून पाहू शकता. खरंतर, बाजारातील कुल्फीसारखी चांगली कुल्फी कमी साहित्यामध्ये घरी बनवता येते ज्यासाठी तुम्हाला फक्त ४ घटकांची आवश्यकता असेल. तुम्हाला कुल्फीचे साचेही लागतील. पण जर तुमच्याकडे ते नसतील तर कुल्फी घरातील कोणत्याही खोल भांड्यात गोठवा आणि आईस्क्रीमसारखे कापून खा. चला तर मग आम्ही तुम्हाला या सोप्या रेसिपीबद्दल सांगतो.

 

कुल्फीसाठी लागणारे साहित्य-

-१ लिटर फुल क्रीम दूध
-१ टीस्पून वेलची पावडर
-१/४ -२ टीस्पून साखर
-१/४ कप क्रीम

 

कुल्फीची रेसिपी-

एका पॅनमध्ये दूध घाला आणि ते उकळण्यासाठी ठेवा.

दूध उकळू लागले की, गॅस मंद करा आणि दूध मंद आचेवर घट्ट होऊ द्या आणि अधूनमधून ढवळत राहा.

ते थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. चांगले मिक्स करा आणि ८ ते १० मिनिटे शिजवा.

आता त्यात वेलची पावडर, क्रीम घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.

आता हे मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर ते आईस्क्रीम मोल्डमध्ये भरा आणि सेट करा.

ते सेट होण्यासाठी ८ ते १० तास फ्रीजमध्ये ठेवा. ८ ते १० तासांनंतर, ते हलक्या हाताने बाहेर काढा.

आता पाण्याच्या भांड्यात ढवळून कुल्फी बाहेर काढा. झटपट दुधाची कुल्फी तयार आहे.

ताज्या बातम्या