MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या

Published:
डोळे फडफडण्याचा संबंध शुभ आणि अशुभ कारणांशी जोडला जातो. यात स्त्री आणि पुरुष यांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ लावले जातात. पण या गोष्टींमागे अनेक वैज्ञानिक कारणं देखील आहेत, ती कारणं कोणती जाणून घेऊ...
डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या

डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. आज आपण जाणून घेऊ की डोळे फडफडवणे योग्य आहे की अयोग्य? ज्योतिषशास्त्रानुसार, डोळे फडफडवणे हे अनेकदा चुकीचे मानले जाते. तर वैज्ञानिक दृष्ट्या असे दर्शविते की ते एखाद्या आजाराचे लक्षण आहे.

शास्त्रांनुसार, कोणत्या डोळ्याचे फडफडणे शुभ आहे?

शास्त्रानुसार, पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते, तर स्त्रियांसाठी डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.

पुरुषांसाठी

पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडल्यास शुभ संकेत मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात, पदोन्नती आणि धनलाभाची शक्यता वाढते. पुरुषांच्या बाबतीत, डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामुळे मोठे संकट किंवा अडचणी येऊ शकतात. पुरुषांसाठी डाव्या डोळ्याचे फडफडणे खूप वाईट मानले जाते, तर उजव्या डोळ्याचे फडफडणे त्यांच्यासाठी खूप शुभ मानले जाते.

स्त्रियांसाठी
स्त्रियांसाठी डावा डोळा फडफडल्यास शुभ मानले जाते. यामुळे मोठा आर्थिक लाभ, रखडलेली कामे पूर्ण होणे आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता असते. स्त्रियांच्या बाबतीत, उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामुळे वाईट बातमी किंवा संकटाची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवली जाते.

डोळे फडफडण्याची वैज्ञानिक कारणे

डोळे फडफडण्याची अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. डोळ्यांच्या स्नायूंच्या अनियमित हालचालीमुळे डोळे फडफडतात. पुरेसा आराम न झाल्याने अपुरी झोप झाल्यामुळे आपल्या शरीरात थकवा जाणतो. आणि अशातून आपल्या पापण्या फडफडतात. डोळ्यांना काही इजा झाल्यास किंवा डोळ्यांना त्रास झाल्यास डोळे फडफडण्याची शक्यता असते. वैज्ञानिक कारणांनुसार, डोळ्यांचे फडफडणे हे स्नायूंमध्ये काही प्रकारच्या तणावामुळे होते. जसे की थकवा, तणाव, कॅफीनचे अधिक सेवन, मॅग्नेशियमची कमतरता, डोळ्यांतील एलर्जी आणि डोळ्यांना होणारी इजा ही प्रमुख कारणे आहेत. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)