MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

झोपताना घोरण्याचा त्रास होत असेल तर मग ‘हे’ घरगुती उपाय कराच

Published:
घोरण्यामुळे अनेक व्यक्तींना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे घोरणे थांबवण्याचे काही घरगुती उपाय आहेत, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
झोपताना घोरण्याचा त्रास होत असेल तर मग ‘हे’ घरगुती उपाय कराच

झोप ही प्रत्येकाला प्रिय असते. झोपताना लोक असा विचार करतात की त्यांना कोणीही त्रास देऊ नये. पण काही लोक असे असतात ज्यांना झोपताना घोरण्याची सवय असते. घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. झोपेत घोरण्याचे कारण श्वसनसंस्थेतील काही अडथळा आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा नसणे हे आहे. थकवा आणि अशक्तपणामुळे, घसा आणि नाकाच्या स्नायू कमकुवत होणे आणि लठ्ठपणा यासारख्या आरोग्याशी संबंधित समस्या, यामुळे घोरणे वाढते. झोपताना घोरण्याचा त्रास होत असल्यास, काही घरगुती उपाय आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या…

ऑलिव्ह ऑइल

जर तुम्हाला घोरण्याच्या समस्येने त्रास होत असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर उपयुक्त ठरतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑयलचे दोन तीन थेंब नाकात घाला आणि मग झोपा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.

हळदीचे दूध

झोपताना घोरण्याचा त्रास होत असल्यास, काही घरगुती उपाय करून आराम मिळवता येतो. त्यापैकी एक म्हणजे हळदीचे दूध. नियमितपणे हळदीचे दूध पिणे घोरण्याची समस्या कमी करू शकते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्म असतात, जे घोरणे कमी करण्यास मदत करतात. 

पुदीना

घोरण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी पुदीनाचाही खूप फायदा आहे. पुदीनाला पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.

लसूण

घोरण्याच्या समस्येवर लसून हे रामबाण उपाय आहे. लसूनचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्ता मिळू शकता. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसून खा. लसून घोरणे कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. 

देशी तूप

नाक साफ नसल्यास तुम्हाला घोरण्याची समस्या असू शकते. त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचं आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि झोपण्यापूर्वी नाकात देशी तुपाचे 2 थेंब टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल. देशी तूप श्वसनमार्ग मोकळा ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे घोरणे कमी होऊ शकते. देशी तूप घोरणे कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी मदत करते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)