थंडगार वातावरणात सगळ्यांचं गरमागरम क्रिस्पी कॉर्न खाण्याची इच्छा होते. क्रिस्पी कॉर्नचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आज आम्ही तुम्हाला झटपट क्रिस्पी कॉर्न बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मक्याचे दाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नेहमीच संध्याकाळी तिखट तेलकट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी कॉर्न बनवण्याची सोपी रेसिपी…
साहित्य
- १ कप स्वीट कॉर्न दाणे (उकडलेले)
- ३ टेबलस्पून मैदा
- २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- थोडा चाट मसाला
- १ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून मिरची फ्लेक्स
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
- सजावटीसाठी लागणारे साहित्य
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
- सर्वप्रथम उकडलेले कॉर्न दाणे एका भांड्यात घ्या. त्यावर मीठ, लाल तिखट, मिरी पूड, मिरची फ्लेक्स आणि लिंबाचा रस टाका.
- आता त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा. दाण्यावर कोटिंग सारखे पीठ लागले पाहिजे.
- कढईत तेल गरम करून तयार मिश्रणातील कॉर्न दाणे थोड्या थोड्या प्रमाणात तळा.
- सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- नंतर टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळून घ्या.
- शेवटी त्यावर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चाट मसाला भुरभुरा.
- गरमागरम क्रिस्पी कॉर्न चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सर्व्ह करा.