Benefits of marigold leaves: झेंडूच्या फुलांचा सुंगध सर्वांनाच आकर्षित करतो. अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी याचा वापर केला जातो. भरातील बहुतेक भागात झेंडूची लागवड केली जाते. विशेष म्हणजे पूजा आणि घराच्या सजावटीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
झेंडूची फुले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु तुम्हाला त्याच्या पानांचे फायदे माहिती आहेत का? झेंडूची पानेसुद्धा अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक उपायांसाठी वापरली जाऊ शकतात. आज या लेखात आपण झेंडूच्या पानांचे आरोग्य फायदे आणि ते कसे वापरावे याबद्दल जाणून घेऊया.
फोडांपासून आराम मिळतो-
डोक्यावरील किंवा त्वचेवरील फोडांना दूर करण्यासाठी झेंडूच्या पानांचा वापर केला जातो. यासाठी झेंडूच्या पानांचा रस पिठात मळून ते पीठ फोड आलेल्या भागावर लावावे. आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने फोड येणे बंद होतात. शिवाय आलेले फोडसुद्धा कमी होतात.
डोळ्यांच्या समस्या दूर होतात-
झेंडूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि इम्युनो-स्टिम्युलेटिंग असे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे त्याच्या वापराने डोळ्यांना होणारी आग, जळजळ आणि खाज कमी होण्यास मदत मिळते. डोळ्यांना गारवा मिळतो. शिवाय डोळे स्वच्छ आणि निरोगी राहतात.
कानदुखीमध्ये फायदेशीर-
झेंडूची पाने कानदुखीच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतात. जर तुम्हालाही कानदुखी होत असेल तर, झेंडूची पाने कुस्करून त्याचा रस कानात सोडा. असे केल्याने कानातील वेदना कमी होतात. तसेच इन्फेक्शनसुद्धा दूर होते.
त्वचेवरील सूज कमी होते-
झेंडूच्या पानांमध्ये सायटोटॉक्सिक, हेपेटोप्रोटेक्टिव्ह आणि स्पास्मोजेनिक गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्हाला त्वचेवर सूज आली असेल तर ते कमी करण्यास मदत होते. ज्या भागावर सूज आहे त्या भागावर झेंडूच्या पानांचा अर्क काढून लावल्यास आराम मिळतो.
बॅक्टेरियापासून संरक्षण होते-
झेंडूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे बॅक्टेरियाचा प्रभाव रोखण्यामध्ये त्याचा वापर केला जातो. कर्करोगाच्या उपचारामध्ये सुद्धा झेंडूच्या पानांचा उपयोग होतो. त्याच्या वापराने कर्कररोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते. तसेच बॅक्टेरिया दूर होतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





