Maruti Baleno की Toyota Glanza: ऑफिसला ये-जा करण्यासाठी कोणती कार चांगली? मायलेज आणि फीचर्स जाणून घ्या

Jitendra bhatavdekar

जर तुम्ही रोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी एक कम्फर्टेबल, किफायतशीर आणि चांगल्या मायलेजची कार खरेदी करू इच्छित असाल, तर Maruti Baleno आणि Toyota Glanza या सर्वात विश्वासार्ह प्रीमियम हॅचबॅक मानल्या जातात. दोन्ही गाड्या बर्‍याच अंशी एकसारख्या आहेत, कारण Glanza ही प्रत्यक्षात Baleno चे रीबॅज्ड व्हर्जन आहे. तरीदेखील, काही छोटे फरक या दोन्ही कारना एकमेकांपासून वेगळं बनवतात. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Baleno vs Toyota Glanza  

किंमतीच्या बाबतीत सर्वात मोठा फरक इथेच दिसून येतो. Maruti Baleno ची सुरुवातीची किंमत Glanza पेक्षा सुमारे 40,000 रुपयांनी कमी आहे, ज्यामुळे बजेटमध्ये कार शोधणाऱ्यांसाठी हे एक मोठं प्लस पॉइंट ठरतं.

त्याचवेळी Glanza ही Toyota च्या बॅजसह येते, ज्यामुळे तिची प्रीमियम इमेज आणि रीसेल व्हॅल्यू वाढते. त्यामुळे तुमचा बजेट मर्यादित असल्यास Baleno उत्तम व्हॅल्यू देते. पण जर ब्रँड व्हॅल्यू आणि क्वालिटी तुमची प्राथमिकता असेल, तर Glanza हा अधिक चांगला पर्याय ठरतो.

इंजिन, परफॉर्मन्स आणि मायलेज

Baleno आणि Glanza दोन्हीमध्ये 1.2-लिटर K-Series पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे सिटी ड्रायव्हिंगसाठी खूपच स्मूद आणि फ्युअल-इफिशियंट मानले जाते. दोन्ही कार इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगसह येतात, ज्यामुळे ट्रॅफिक जॅम किंवा शहरातील अरुंद लेनमध्ये त्यांना चालवणे खूप सोपे होते.

CNG मोडमध्ये पॉवर थोडी कमी होते आणि ती 77 bhp पर्यंत मर्यादित राहते, पण रोज ऑफिसला जाण्यासाठी ही परफॉर्मन्स पुरेशी आहे.

मायलेजच्या बाबतीतही दोन्ही कार CNG मोडमध्ये 30.61 km/kg आणि पेट्रोल मोडमध्ये साधारण 22–23 kmpl चे सरासरी मायलेज देतात. त्यामुळे दररोज 50–60 किलोमीटर चालवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी CNG व्हेरियंट खूपच फायदेशीर ठरतो.

ताज्या बातम्या