MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Momo Seller Earn Lakhs Rupees : नोकरी विसरा!! Momo वाला दिवसाला कमावतोय लाखो रुपये

मागच्या काही वर्षात मोमोजने भारतात मार्केट खाल्ले आहे... जिकडे बघेल तिकडे फक्त आणि फक्त मोमोजचे गाडी बघायला मिळतायत
Momo Seller Earn Lakhs Rupees : नोकरी विसरा!! Momo वाला दिवसाला कमावतोय लाखो रुपये

Momo Seller Earn Lakhs Rupees | आपल्या भारतात रस्त्यावरील स्ट्रीट फूड आवडीने खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग तो वडापाव, समोसा, चाट, डोसा असो वा इडली…. परंतु मागच्या काही वर्षापासून ह्यात आणखी एका पदार्थाचा समावेश झालाय जो बघताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.. होय आम्ही बोलतोय मोमोज बद्दल… मागच्या काही वर्षात मोमोजने भारतात मार्केट खाल्ले आहे… जिकडे बघेल तिकडे फक्त आणि फक्त मोमोजचे गाडी बघायला मिळतायत… परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? जो व्यक्ती मोमोज विकतोय तो दिवसाला किती रुपये कमावत असेल?? एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने थेट मोमोज च्या गाड्यावर जाऊन त्याचा अंदाज घेतला असता, तुमचेही डोळे थक्क होईल असा आकडा समोर आला. मोमो वाला दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचं समोर आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

नेमके काय घडलं? Momo Seller Earn Lakhs Rupees

खरं तर, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर @cassiusclydepereira ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो स्वतः एका दिवसासाठी मोमो स्टॉलवर उभा राहिला आणि त्याच्या कमाईचा हिशोब केला. या व्हिडिओला १८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओची सुरुवात एका विनोदी प्रश्नाने होते: “मोमो विक्रेता बी.कॉम. पदवीधर व्यक्तीपेक्षा जास्त कमाई करू शकतो का?” त्यानंतर तो स्टॉलवर उभा राहतो आणि ग्राहकांना मोमोज देण्यास सुरुवात करतो. (Momo Seller Earn Lakhs Rupees)

दिवसाला किती प्लेट विक्री होते

व्हिडिओमध्ये दाखवले आहे की स्टॉल खूप लोकप्रिय आहे.  फक्त एका तासात ११८ प्लेट मोमोज विकले गेले! गर्दी इतकी मोठी होती की पुन्हा मोमो भरावे लागले. जसं जशी संध्याकाळ होत होती तसं तशी ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. हा स्टॉल संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चालतो, एकूण ५ तास. एका प्लेट मोमोजची किंमत ₹११० आहे. दिवसभरात एकूण ९५० प्लेट मोमोज विकले गेले. जर हिशोब करायचा झाल्यास, ९५० × ११० = ₹१,०४,५०० (एका दिवसाची एकूण विक्री). म्हणजेच काय तर दर महिन्याचा हिशोब केल्यास हा मोमो विक्रेता तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त कमाई करतोय. आजकाल नोकरी तरी इतके पैसे मिळत नाहीत. अनेकांना तर 30 लाख रुपये कमवण्यासाठी पाच सहा वर्षांचा काळ लागतो. मात्र हा मोमोज वाल्याने फक्त एका महिन्यातच 30 लाखाची कमाई करून अनेकांना थक्क केला आहे