MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचा कर्करोगामुळे मृत्यू, वयाच्या ३० नंतर महिलांमध्ये दिसतात Cancer ची ही लक्षणं

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. ज्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले होते. मात्र उपचारानंतरही ती बरी होऊ शकली नाही.
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचा कर्करोगामुळे मृत्यू, वयाच्या ३० नंतर महिलांमध्ये दिसतात Cancer ची ही लक्षणं

मराठी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. प्रियाने हिंदीतील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्तामध्ये अंकिता लोखंडेच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचं निदान झालं होतं. ज्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले होते. मात्र उपचारानंतरही ती बरी होऊ शकली नाही, आणि उपचारादरम्यान तिचं निधन झालं. वयाच्या ३५-४० नंतर महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

महिलांमधील ३ कॅन्सर आणि त्याची लक्षणं

ब्रेस्ट कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनांच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागलात आणि ट्यूमरचं रुप घेतात. हे कोणत्याही वयात होऊ शकतं. मात्र वय वाढतं तसा धोका वाढतो. नियमित स्क्रीनिंग टेस्ट केल्याने ब्रेस्ट कॅन्सरबाबत लवकर कळू शकतं. जेव्हा कॅन्सर लहान असतो तेव्हा उपचार करणं सोपं असतं.

लक्षणं

स्तनात वेदनेसह गाठ दिसणे
स्तन वा निप्पलच्या आकारात बदल
निप्पल्समध्ये जळजळ
निप्पलमधून रक्तासारखा द्रव्य बाहेर पडणे

कोलन कॅन्सर

कोलन कॅन्सरला कोलोरेक्टर कॅन्सरही म्हटलं जातं. बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, लाल आणि प्रक्रिया केलेले मांस असलेले आहार आणि कौटुंबिक इतिहास यामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. एसीएसनुसार, प्रत्येकाने वयाच्या ४५ व्या वर्षी नियमित तपासणी सुरू करावी. यामुळे कर्करोग लवकर ओळखण्यास मदत होते.

लक्षण

वारंवार जुलाब होणं
मलात रक्त येणं
मलत्यागानंतरही पोट स्वच्छ झाल्याची भावना न होणं
अशक्तपणा, थकवा
प्रयत्नाशिवाय वजन कमी होणं

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांना होणारा आणखी एक कर्करोगाचा प्रकार आहे, ह्यूम पेपिलोमावायरस म्हणजेच एचपीव्ही हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असुरक्षित संभोग, मासिक पाळीच्या अस्वच्छतेमुळे आणि संक्रमित अवयवांच्या त्वचेच्या संपर्कामुळे पसरतो. बहुतेक लोकांना माहीत नसतं की, त्यांना HPV आहे. लसीकरण हा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

लक्षण

योनीमधून रक्तस्त्राव
मेनोपॉजनंतर योनीहून रक्तस्त्राव
यौनसंबंधादरम्यान पेल्विक वेदना
मासिक पाळीदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव
लघवीतून रक्त
पायाला सूज
पोटात दुखणे
थकवा