Benefits of Talking to Girlfriend: मैत्रीचं नातं सर्वांसाठीच खूप खास असतं. जेव्हा एक मुलगा आणि मुलीमध्ये मैत्री होते, तेव्हा हे नातं अधिक खास होतं. विज्ञानानुसार, गर्लफ्रेंड असल्याने मुलांना खूप फायदा मिळतो. मुलींमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन रिलिज होतो, ज्यामुळे त्या खूश राहतात आणि आपल्या आजूबाजू्च्या लोकांनाही खूश ठेवतात. याचा मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात पाच मिनिटांपर्यंत आपल्या गर्लफ्रेंडशी बोलण्याचा फायदा अर्ध्या तासाच्या व्यायमाच्या बरोबर होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर indikhabarlive अकाऊंटवरुन याबाबत सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊया असं का होतं आणि गर्लफ्रेंडचे काय काय फायदे होऊ शकतात.
ऑक्सीटोसिन हॉर्मोन्सचा परिणाम (what is Oxytocin Hormone)
ऑक्सीटोसिन हॉर्मोन्सला लव होर्मोन्सदेखील म्हटलं जातं. या हॉर्मोन्समुळे नैसर्गिकपणे संवेदनशीलतेचा गुण येतो. या हॉर्मोन्समुळे मुली जास्त केयरिंग होतात. त्याच्या अधिकांश गुणांमागे हेच हार्मोन काम करतं.

गर्लफ्रेंडशी बोलण व्यायाम करण्याप्रमाणे(Why talking to your favorite woman is like exercise)
नुकत्याच झालेल्या रिसर्चमध्ये रिलेशनशिप आणि कम्युनिकेशनबाबत खुलासा करण्यात आला आहे. आवडत्या महिलेसोबत संवाद साधणं व्यायामासमान आहे. हा संवाद मेंदू आणि भावना दोघांना अॅक्टिव्ह करते. अशा संवादात व्यक्तीला भावनिक अंडरस्टँडिंग, पेशन्स आणि मेंटल एनर्जीची गरज असते. जे मेंटल वर्कआऊटप्रमाणे काम करतं. यामुळे टेन्शनही कमी होतं आणि आत्मविश्वास वाढायला मदत होते. रिसर्चनुसार चांगलं कम्युनिकेशन नातं मजबूत करण्यासह मेंटल हेल्थही सुधारतं.
आवडत्या महिलेसोबत संवादाचे फायदे (Talk to your favorite woman )
नैराश्य दूर होतं.
गर्लफ्रेंडमुळे ऑक्सीटोसिन हार्मोन वाढतं आणि हे टेन्शन कमी करायला मदत करतं. यामुळे नैराश्य, तणाव सारखे गंभीर त्रास कमी व्हायला मदत होते.
भावनिक व्यवस्थापन
अधिकांश मुलं आपली भावना जाहीर करू शकत नाहीत. मुलांच्या तुलनेत मुली अधिक भावनिक असतात आणि अनेकदा फिलिंग्स शेअर न करताही तुमचा त्रास समजून घेतात.
आपल्या लोकांची काळजी घेते.
विज्ञानानुसार, मुलींच्या रक्तात नेहमी ऑक्सीटोसिन हार्मोन फ्लो होत असतो. त्यामुळे त्या ज्यादा प्रोटेक्टिव असतात आणि आपल्या लोकांची काळजी घेतात.
इमोशनल, बौद्धिक आणि सामाजिक वागणुकीवर परिणाम
ऑक्सीटोसिन मेंदूच्या अनेक भागांमध्ये पोहोचल्यानंतर बौद्धिकतेसह भावनात्मक आणि सामाजिक वागणुकीवर परिणाम करतं. मुलींमध्ये भावनिक पातळीवर गोष्टी समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली असते आणि त्या आपल्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. कदाचित याच कारणामुळे मुलांच्या भावना त्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतात. आणि आपलं नातं अधिक चांगल्या पद्धतीने मॅनेज करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)