MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

पारंपरिक पद्धतीने बनवा शेंगदाण्याची चटणी, एकदम सोपी आहे रेसिपी

Published:
तुम्हालाही घरात पारंपरिक पद्धतीने शेंगदाणा चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
पारंपरिक पद्धतीने बनवा शेंगदाण्याची चटणी, एकदम सोपी आहे रेसिपी

 Maharashtrian Peanut Chutney:   शेंगदाणा भाजून किंवा तसाच खायला प्रत्येकालाच आवडतो. त्यासोबतच शेंगदाणा चटणीसुद्धा अनेकांना आवडते. भाकरी किंवा भातासोबत खाल्यास चव आणखी वाढते. महाराष्ट्रात शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तुम्हालाही घरात पारंपरिक पद्धतीने शेंगदाणा चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी तुमच्यासाठी आहे…

 

शेंगदाणा चटणीसाठी आवश्यक साहित्य-

 

२५० ग्रॅम शेंगदाणे
१ चमचा भाजलेले जिरे
२ चमचे मीठ
२ चमचे लाल मिरची पावडर
५-६ पाकळ्या लसूण

 

शेंगदाणा चटणीची रेसिपी-

 

सर्वप्रथम भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा घरी एका पॅनमध्ये भाजून घ्या आणि साले काढून टाका.

आता ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

मिक्सरमध्ये वाटण करताना लसूण, जिरेसुद्धा घालून चांगले बारीक करा.

आता लाल तिखट घालून एका भांड्यात घ्या आणि हाताने चोळून चांगले मिसळा.

अशाप्रकारे चटणी तयार आहे. ते कोणत्याही गोष्टीसोबत तुम्ही खाऊ शकता.