What are the benefits of consuming kiwi: चांगल्या आरोग्यासाठी फळे खाणे आवश्यक असते. त्यातल्या त्यात किवी हे फळ आरोग्यासाठी उत्तम असते. तुम्हाला माहिती आहे का की, एका किवीमध्ये इतके व्हिटॅमिन सी असते की ते प्रौढ व्यक्तीच्या दैनंदिन व्हिटॅमिन सीच्या गरजेच्या ८०% गरज पूर्ण करू शकते. इतकेच नव्हे तर किवीमध्ये व्हिटॅमिन ई, के, अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच, किवी हे सुपरफूडपेक्षा कमी नाही.
व्हिटॅमिन्स सी फायदेशीर-
अँटी-ऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असल्याने किवी त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. किवी खाल्ल्याने त्वेचवरील सुरकुत्या दूर होतात. चेहरा चमकदार बनतो. शिवाय केस गळणे कमी होतात. आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते-
किवी हा फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन्स सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन्स सीच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. त्यामुळे किवीचे सेवन केल्यास अनेक समस्या दूर होतात. शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
इंसोमिनियाची समस्या दूर होते-
किवीमध्ये सिरोटोनिन उपलब्ध असते. जे चांगल्या झोपेसाठी मदत करते. किवीचे सेवन केल्याने इंसोमिनियाची समस्या दूर होते.
पचनक्रिया सुधारते-
तुम्हाला माहिती आहे का कि, तुम्ही जर दररोज आहारात किवींचा समावेश केला तर तुमच्या पोटाच्या आणि पचनक्रियेच्या अनेक समस्या दूर होतील. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, किवींचा आहारात समावेश केल्याने बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या कमी होतात. किवी पचनक्रिया तर सुधारतेय.स शिवाय अनेक आरोग्य फायदेसुद्धा देते.
वजन कमी करण्यास मदत करते-
किवीमध्ये कमी कॅलरी असते. शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाल्ल्याने पोट बराचकाळ भरलेले राहते. तसेच मेटाबॉलिज्म वाढतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
अनेकजण किवी खाताना त्याची सालसुद्धा खातात. त्यांच्या मते सालीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. परंतु किवी खाताना साल खाण्याची गरज नाही. आवश्यक फायदे मिळवण्यासाठी फक्त किवींचा गाभा खाणे पुरेसे आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)