थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी आहारात सामील करा ‘या’ औषधी वनस्पती, जाणून घ्या फायदे

Ayurvedic remedies to reduce thyroid:   महिलांमध्ये थायरॉईडची समस्या वाढत आहेत. थायरॉईड शरीरातील चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स सोडते. थायरॉईड ग्रंथीचे चुकीचे कार्य विविध आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. थायरॉईडच्या समस्येवर कायमस्वरूपी कोणताही इलाज नाही, म्हणून तुम्ही योग्य आहार घेऊन आणि जीवनशैलीत काही निरोगी बदल करून त्यावर नियंत्रण ठेवू शकता. आयुर्वेदात थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी सेवन करता येणारे पाच सुपरफूड्स आणि औषधी वनस्पतींबाबत सांगण्यात आले आहे….

 

धणे-

धणे जीवनसत्त्वे अ, क, के आणि फोलेटने समृद्ध असतात. हे गुणधर्म थायरॉईडचे कार्य सुधारण्यासाठी, पोट फुगणे कमी करण्यासाठी आणि तुमच्या यकृतामध्ये T4 चे T3 मध्ये रूपांतर सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जातात. रात्रभर पाण्यात एक चमचा धणे भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

आवळा-
आवळ्यात संत्र्यांपेक्षा आठ पट जास्त व्हिटॅमिन सी आणि डाळिंबापेक्षा अंदाजे १७ पट जास्त व्हिटॅमिन सी असते. आवळा खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात आणि थायरॉईडच्या समस्या कमी करण्यास किंवा नियंत्रित करण्यास देखील फायदेशीर ठरते. आवळा खाल्ल्याने थायरॉईडच्या समस्यांमुळे केस गळणे देखील नियंत्रित किंवा कमी होते. तुम्ही आवळा रस, पावडर किंवा भाजीच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता.

नारळ पाणी-
थायरॉईड रुग्णांसाठी नारळ पाणी हा एक उत्तम पदार्थ आहे. नारळात MCFA आणि MTC (ट्रायग्लिसराइड्स) भरपूर प्रमाणात असतात. जे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतात.

 

शेवगा-

शेवगा, ज्याला ड्रमस्टिक म्हणूनही ओळखले जाते. त्यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे ते थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी आणि योग्य पातळी ठेवण्यासाठी उत्तम आहे.

सुकं खोबरं-
थायरॉईड रुग्णांसाठी सुकं खोबरं खूप फायदेशीर आहे. ते पचनक्रिया आणि मंद चयापचय सुधारू शकते आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य चांगले करण्यास मदत करते.

जर तुम्हाला थायरॉईड असेल आणि तुम्ही ते नियंत्रित करण्यासाठी दररोज औषधे घेत असाल, परंतु तरीही केस गळणे, कोरडी त्वचा, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे, बद्धकोष्ठता आणि मूड स्विंग्स यासारख्या समस्या येत असतील, तर तुम्ही तुमच्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करू शकता.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News