सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे…

Asavari Khedekar Burumbadkar

आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात.

सकाळी उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्याने दिवस फ्रेश जातो. यासह व्हिटॅमिन डी देखील मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करतात. या शिवाय अनवाणी चालल्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते.

गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे.

मधुमेह रुग्णांसाठी लाभदायी

अनवाणी पायाने चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. नियमित अनवाणी चालल्याने शरीरातील उर्जेची पातळी तर वाढतेच, शिवाय तणाव, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश, हृदयाशी संबंधित समस्या, संधिवात, दमा या समस्या दूर राहतात.

पायांचा व्यायाम होतो

अनवाणी चालल्याने सर्व स्नायू सक्रिय होतात. यासह पायांव्यतिरिक्त, त्यांच्याशी संबंधित शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात.

डोळ्यांची दृष्टी सुधारते

नियमित अनवाणी चालल्यामुळे डोळ्यांपासून ते ह्रदयापर्यंत त्याचा फायदा शरीराला होतो. जर आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर, नियमित थोडा वेळ का असेना अनवाणी चाला.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या