Water After Food Disadvantages: आपल्या आरोग्यासाठी आहार आणि पाणी दोन्ही आवश्यक आहे. मात्र या दोन्ही गोष्टींची योग्य वेळ अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लोक जेवताना किंवा लगेच पाणी पितात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सवय पचन यंत्रणेला कमकुवत करते. सोबतच अनेक आजारांची सुरुवात होण्याची भीती असते.
जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे
- डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम टाकू शकतात.
- यामुळे पोटात गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते
- ब्लोटिंग आणि शरीरात जडत्व जाणवणे
- पचन योग्य पद्धतीने होत नाही, ज्यामुळे वजन वाढतं
- काही प्रकरणात रक्तातील साखल जलद गतीने वाढते
पाणी कधी प्याल? Water after eating Marathi
- जेवणाचं पचन होण्यासाठी कमीत कमी दोन तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
- जेवण झाल्यानंतर ४५ ते ६० मिनिटांनी पाणी प्यावं
- आधी पाणी प्यायचं असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावं
- अशा प्रकारे शरीर अन्नातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते.
योग्य वेळेत पाणी पिण्याचे फायदे l Water After Food Side effects
- जेवणाच्या साधारण एका तासानंतर पाणी प्यायल्याने शरीराला अनेक लाभ होऊ शकतात.
- वजन नियंत्रणात राहतं आणि स्थूलता येत नाही
- पचन मजबूत होतं आणि पोट हलकं राहतं
- गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवत नाही
- अन्नातील पोषक तत्वांचं शोषण चांगल्या प्रकारे होतं.
- झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीर अधिक रिलॅक्स वाटू लागतं.
जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणं शरीरासाठी नुकसानदायक होऊ शकतं. जर तुम्ही योग्य वेळेत पाणी प्यायलात तर तुमचं पचन यंत्रणा व्यवस्थित होईल, याशिवाय स्थूलता, अॅसडिटी आणि ब्लोटिंगसारखे त्रास दूर होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











