Vitamin For Strong Brain: जसं जसं वय वाढतं, शरीरासह मेंदूचं आरोग्य जपणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकांना वाटतं की, कोडी सोडवणं किंवा नव्या गोष्टी शिकणं पुरेसं असतं. मात्र आहारदेखील तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य विटॅमिन्स आणि मिनरल्स स्मरणशक्ती फोकस आणि मानसिक क्षमता मजबूत करते. त्यामुळे वय वाढलं तरी मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं. कोणते पोषक तत्व मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक असतात आणि त्यांना आपल्या डाएटमध्ये कसे सामील करू शकतो.
बी-विटॅमिन्समुळे स्मरणशक्ती आणि मूड सुधारतो (Vitamin B)
बी६, बी९ आणि बी१२ सारख्या बी विटॅमिन्स मेंदूच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. ते न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यात मदत करतात. जे मेंदूच्या सेल्समध्ये संदेश पोहोचवण्याचं काम करतात. यामुळे मूड चांगला राहतो आणि स्मरणशक्तीही सुधारते. विशेषत: बी१२ नसा आणि रक्तात ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे. वय वाढतं तसं शरीरात बी१२ ची कमतरता भासते. ज्यामुळे थकवा आणि विस्मरणाची समस्या वाढू शकते. हिरव्या पालेभाज्या, अंडी, मासे, निकन आणि फोर्टिफाइड सीरियल्स याचे चांगले स्त्रोत आहेत.

विटॅमिन डीमुळे मानसिक स्वास्थ सुधारतं (Vitamin D)
विटॅमिन डीला अनेकदा सनशाइन विटॅमिन म्हटलं जातं. विटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळतं. याचा परिणाम मेंदूच्या सेल्सवर होतो आणि विचार करण्याची क्षमत वाढते. याशिवाय मूड संतुलित राखण्यास मदत मिळते. संशोधनानुसार, ज्या लोकांच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असते, त्यांना मानसिक कमकुवतपणा आणि विस्मरणाचा त्रास अधिक पाहायला मिळतो. फॅटी फिश, दूध आणि सूर्याचा प्रकाश याचा नैसर्गिक स्त्रोत आहेत.
ओमेगा ३ फॅटी अॅसिड्समुळे मेंदूंचं सुरक्षा (Omega 3 Fatty Acid)
ओमेगा ३ फॅटी अॅसिड मेंदूचं सेल्स मजबूत आणि फ्लेक्सिबल करतं. यामुळे मेंदूवरील सूज करी होते आणि मेंदूची कार्यप्रणाली अधिक चांगली होते. विशेषत: डीएचए आणि ईपीए नावाचा ओमेगा ३ मेंदूच्या संरचनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सालमन, मॅकेरल, सार्डिन सारख्या माशांसोबत अळशीच्या बिया, अकरोट आणि चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जर डाएटमध्ये याचा समावेश शक्य नसेल तर सप्टिमेंट घेता येऊ शकतं.
अँटीऑक्सिडेंट्समुळे सेल्सची सुरक्षा (Antioxidants)
विनटॅमिन सी आणि विटॅमिन ईसारख्या अँटीऑक्सिडेंट मेंदूला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. फ्री रेडिकल्स मुळे मेंदूच्या सेल्सना धोका असतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया जलद होते. अँटीऑक्सिडेंट यांच्याशी लढा देत मेंदूचे सेल्स सुरक्षित ठेवतात. संत्र, लिंबू, शिमला मिरची, पालक, बदाम, सूर्यफुलाच्या बिया यामध्ये मुबलक पोषक तत्व असतात.
मॅग्नेशिअयममुळे मेंटर क्लिअरिटी
स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता मजबूत करणे आणि मेंदूला रिलॅक्स ठेवतो. पालक, बदाम, धान्य, डाळी आणि फरसबी यामध्ये मॅग्नेशिअमचं चांगलं प्रमाण असतं.
अन्न की सप्लिमेंट, काय चांगलं?
अधिकांश प्रकरणात फूट प्रोडक्ट सप्लिमेंटपेक्षा चांगले मानले जातात. यामध्ये पोषक तत्व नैसर्गिक आणि संतुलित रुपात असतात. मात्र डाएटमधून पुरेसं पोषण न मिळाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)