Pomegranate : दररोज एक डाळिंब खाल्ल्याने काय होतं?

Smita Gangurde

Benefits of eating pomegranate : डाळिंब हे एक असं फळ आहे, जे केवळ दिसायलाच नाही तर खाण्यातही चवदार असतं. यामध्ये अँटीऑक्सिडेंट, विटॅमिन सी, के, फायबर, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतं. दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि दररोजच्या डाएटमध्ये याचा समावेश का करायला हवा याबद्दल जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक शक्ती –

डाळिंबात मुबलक प्रमाणात विटॅमिन सी असतं. दररोज याचं सेवन शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करून व्हायरल, फ्लू, खोकला-सर्दीसारख्या संसर्गातून सुटका देण्यास मदत करू शकतं.

त्वचा –

डाळिंबात अँटी एजिंग गुण असतात, जे त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करू शकते. याचं नियमित सेवन फ्री रेडिकल्सशी लढा देत सुरकुत्या कमी करतं आणि त्वचा चमकदार करण्यास मदत करू शकतं. त्वचेसंबंधित समस्येतून दिलासा मिळविण्यासाठी दररोज एक डाळिंबाचं सेवन अवश्य करा.

पचन –

डाळिंबात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. याच्या नियमित सेवनामुळे पचन क्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्येतून सुटका होते. पचन संबंधी त्रास दूर करण्यासाठी तुम्ही आपल्या डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करू शकता.

हृदय –

डाळिंबातील अँटी ऑक्सिडेंट वाईट कोलेस्टेरॉल कमी करतंय आणि चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढविण्यासाठी मदत करते. याचं नियमित सेवन रक्तदाब नियंत्रण करू शकतं. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतं.

कॅन्सर –

डाळिंबात अँटी-कॅन्सर गुण असतात. या पेशींना कर्करोगजन्य प्रभावांपासून वाचवण्यास मदत करू शकते. विशेषतः ते प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या