What to eat to get glow on the face: आजकाल चमकदार त्वचेसाठी सर्वजणच पार्लरमध्ये पैसे खर्च करतात. अनेकजण महागडे प्रॉडक्टस वापरतात. परंतु या गोष्टींचा प्रभाव ठराविक वेळेतच दिसून येतो. त्यामुळे सतत पैसे खर्च करावे लागतात. अनेकांना वेगवेगळे प्रॉडक्टस वापरून चेहऱ्यावर पिंपल्स, डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे काहीजण हे वापरणे टाळतात.
मग चमकदार त्वचा कशी मिळवायची असा प्रश्न पडतो. परंतु त्वचा तज्ज्ञांच्या मते, सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्वचेला आतून पोषण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तुमचा आहार फार महत्वाचा आहे. तुम्ही काय खाता-पिता याचा तुमच्या त्वचेवर प्रभाव दिसून येतो. आज आपण त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आहार कसा हवा याबाबत जाणून घेऊया…
भरपूर पाणी प्या-
त्वचा चमकदार आणि नितळ बनवण्यासाठी सर्वात आधी पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण शरीराला हायड्रेटेड ठेवल्याने त्वचाही हायड्रेटेड राहते. त्यामुळे पिम्पल्सची समस्या कमी होते. तज्ज्ञांच्या मते दिवसभरात कमीत-कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.
फळे आणि पालेभाज्या-
फळे आणि भाज्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवतात. त्यामुळे आपल्या आहारात फेल आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही गाजर, बीट, काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी खाऊ शकता.
मोड आलेले कडधान्ये-
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटिन, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेला भरपूर फायदा मिळतो. त्वचे नितळ आणि चमकदार बनते. त्यामुळे आपल्या आहारात मूग, मटकी, मेथी, हरभरा, डाळी, असे मोड आलेले पदार्थ खावेत. हे पदार्थ त्वचेच्या पेशी निर्माण करण्यासही मदत करतात.
धान्यांचा समावेश-
आपल्या आहारात तुम्ही गहू, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस यांसारख्या धान्यांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील घाण पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा नितळ आणि सुंदर बनते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





